Nag Panchami Puja Mantra sakal
लाइफस्टाइल

Nag Panchami 2023: नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना कोणते मंत्र म्हणावे? जाणून घ्या

Nag Panchami Puja Mantra: या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे.

Aishwarya Musale

Nag Panchami Puja Mantra: हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या नागपंचमीचा सण मंगळवार, 21 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात सापाला भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार मानले जाते.

त्यामुळे या दिवशी नागांची देवता महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे मानले जेते की, जो व्यक्ती या दिवशी नागाची विधिवत पूजा करतो त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कधीही सापाची भीती राहत नाही.

पूजन विधी कसा करावा?

नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सर्वात पहिले शंकराचे ध्यान करावे त्यानंतर नाग-नागीण जोडीच्या प्रतिमेची (सोने, चांदी किंवा तांब्यापासून निर्मित) पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, कबल, शंखपाल, पद्मनाथ, धृतराष्ट्र, तक्षक, कालिया या नऊ नागांच्या नामावालीचे नामस्मरण करून फुले, हरभरे, लाह्या वाहाव्या व दुध पाजावे.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।

शंखपाल धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा।।

एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।

सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।।

तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्।।

त्यानंतर व्रत-उपवास करण्याचा संकल्प करावा. नाग-नागीण प्रतिमेला दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून अक्षता, गंध, फुल अर्पण करून मिठाईचा नैवेद्य दाखवावा. धूप-दीप लावून मनोभावे दर्शन घ्यावे. खालील स्तोत्र म्हणावे.

सर्वे नागा: प्रीयन्तां मे ये केचित् पृथिवीतले।।

ये च हेलिमरीचिस्था येन्तरे दिवि संस्थिता।

ये नदीषु महानागा ये सरस्वतिगामिन:।

ये च वापीतडागेषु तेषु सर्वेषु वै नम:।।

या प्रार्थनेनंतर नाग गायत्री मंत्राचा जप करावा.

वाऊँ नागकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT