nag panchami rules sakal
लाइफस्टाइल

Nag Panchami 2023: नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये; जाणून घ्या

Nag Panchami Rules: नागपंचमी हा नागदेवतेची पूजा करण्याचा एक पारंपरिक सण आहे.

Aishwarya Musale

Nag Panchami Niyam: नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी हा सण हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा नागपंचमीचा सण मंगळवार, 21 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. 

या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख-शांती राहते, असा समज आहे. अनेकजण या दिवशी उपवासही करतात. पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे.

नागपंचमीचे महत्व

हिंदू धर्मात नाग पंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख-समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबत शंकर देवाची पूजा करावी.

यामुळे कार्ल सर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घराच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्र काढले जाते. असे केल्याने त्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो.

नागपंचमीच्या दिवशी हे काम करा

  • नागपंचमीच्या दिवशीही उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदंश टाळता येतो असे सांगितले जाते.

  • नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करावीत.

  • ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु केतू भारी आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी.

  • लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये, यासाठी तांब्याचे भांडे वापरावे.

नागपंचमीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका

  • लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नयेत.

  • या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात.

  • नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते.

  • याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT