Hair Fall Problem Sakal
लाइफस्टाइल

Hair Fall: टाळूला खाज सुटणे अन् कोंडामुळे त्रस्त आहात? 'या' हिरव्या पानांचा करा उपाय

Neem Leaves Benefits: तुमच्या टाळूला खाज सुटत असेल किंवा कोंडा निर्माण होत असेल तर कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता.

Puja Bonkile

Neem Leaves Benefits: अनेकांना त्वचा किंवा टाळू अस्वच्छ असल्यास खाज किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या शॅम्पू आणि केसांच्या सीरमचा वापर करतात. पण समस्या कमी होत नाही. विशेषत: कोंड्याची समस्या पूर्णपणे बरी होत नाही आणि पुन्हा पुन्हा परत येते. बदलत्या हवामानामुळे कोंडा किंवा कोंड्याची समस्या वाढते.

टाळूमध्ये कोरडेपणा वाढल्याने देखील कोंडा होऊ शकतो. डोक्यातील कोंडा असलेल्या व्यक्तीला केस गळण्याचा त्रास अधिक असतो. या दोन्ही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. पण कसा करावा हे जाणून घेऊया.

केस आणि टाळूसाठी कसे फायदेशीर असते?

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे बॅक्टेरिया आणि दुर्गंधी दूर करतात.

डोक्यातील कोंडा किंवा कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी कडुलिंबाचे पानं गुणकारी आहे.

केसांमधून येणाऱ्या दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचाही वापर करू शकता.

टाळू आणि केसांसाठी कडुलिंबाची पानांचा वापर कसा करावा?

शॅम्पू करण्यापूर्वी डोक्याला कडुलिंबाचे पाणी लावावे. कडुलिंबाच्या पाण्यानी केस धुवा आणि नीट स्वच्छ करा. यासाठी कडुलिंबाची पानं एक लिटर पाण्यात उकळून घ्यावी. जेव्हा पाणी चांगले उकळते आणि अर्ध्यापेक्षा कमी होते तेव्हा कडुलिंब आणि पाण्याचे मिश्रण गॅसमधून काढून टाका. ते थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवा. या कडुलिंबाच्या पाण्याने डोक्याला आणि केसांना मसाज करा. नंतर, 15-20 मिनिटे आपल्या टाळूवर राहू द्या. त्यानंतर, शैम्पू करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

AI and post‑2000 era : दोन हजारोत्तरी काळ, डिजिटल क्रांती आणि एआयचा उदय; बदलत्या जगातल्या आपल्या जाणिवांचा वेध

Facebook Fraud Marriage : फेसबुकवरून ओळख, अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचा विश्वास; रायगडचे कुटुंब कोल्हापुरात आलं अन् घडलं भलतचं...

Pune PMPML: चालकांची बेफिकिरी केव्हा थांबणार?, प्रवासी नसूनही थांब्यावर, पुण्यातील पीएमपी आगारात बस कित्येक मिनिटे सुरूच..

ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, सिक्रेट सर्विसने वाचवला जीव; हल्लेखोर ताब्यात, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT