one stop centre scheme sakal
लाइफस्टाइल

‘वन स्टॉप’ आधार

पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच संकटकाळात या महिलांना आधार वैद्यकीय उपचारांसह सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात.

सकाळ वृत्तसेवा

पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच संकटकाळात या महिलांना आधार वैद्यकीय उपचारांसह सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात आणि त्याद्वारे त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने राज्यात ‘वन स्टॉप सेंटर’ ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

महिलांवर होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार, आर्थिक छळवणूक, समाजाकडून होणारा त्रास आणि अवहेलना, अशा संकटांत त्या महिलेस आणि तिच्या कुटुंबीयांस न्याय मिळविण्यासाठी; तसेच वैद्यकीय उपचारांसाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये जावे लागत असल्याने अशा संकटग्रस्त महिलांसाठी आवश्यक उपचार आणि मदत एकाच छताखाली मिळावी, या उद्देशाने ही योजना राज्य सरकारने लागू केली आहे.

हिंसाचारामुळे पीडित आणि संकटात असलेल्या महिला, गरजू स्त्रिया त्यांच्यासह हिंसाचाराने प्रभावित त्यांच्या मुलांसह (सर्व वयोगटातील मुली आणि १२ वर्षांपर्यंतची मुले) जास्तीत जास्त पाच दिवसांच्या कालावधीसाठी ‘वन स्टॉप सेंटर’ या केंद्रामध्ये तात्पुरता निवारा घेऊ शकतात.

पीडित गरजू महिला आणि हिंसाचाराने प्रभावित झालेल्यांना त्यांच्या मुलांना मदत आणि आधार देणे, तसेच वैद्यकीय उपचार, समुपदेशन, पोलिस सहायक, मानसोपचार, कायदेशीर सुविधा, तात्पुरता निवारा, अन्न उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा उद्देश आहे.

महिलांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार, आर्थिक छळवणूक समाजाकडून होणारा त्रास, अशा संकट काळात न्याय मिळविण्यासाठी महिलांना आणि तिच्या कुटुंबीयांना आतापर्यंत शासनाच्या विविध विभागांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या; परंतु आता या केंद्रातच आवश्यक उपचार आणि मदत, सुविधा उपलब्ध होत आहेत.

सध्या राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये ३७ केंद्रे कार्यरत आहेत. या योजनेअंतर्गत संबंधित महिलेस वैद्यकीय उपचार, समुपदेशन, पोलिस साह्य, मानसोपचार, विधी साह्य, अल्प कालावधीसाठी निवारा आणि अन्न अशा सुविधा पुरविण्याची तरतूद आहे.

अधिक माहितीसाठी - https://csr.wcdcommpune.com/index.php/mr/schemes/vana-sataopa-saentara-yaojanaa

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT