लाइफस्टाइल

Health Care News : ओव्हरथिंकिंग करणं कसं थांबवाल? शरीरावर होतात घातक परिणाम, बचावासाठी करा हे उपाय

तुम्हीही आहात Overthinking चे शिकार? मग हे उपाय करून बघा

Aishwarya Musale

बरेचदा असे होते की, निर्णय घेण्यापूर्वी आपण त्याबद्दल खूप विचार करतो आणि हा विचार इतका वाढतो की रात्री झोप देखील येत नाही. हे प्रत्येकासोबत कधी ना कधी घडते. निर्णय घेताना किंवा परिस्थितीचे मूल्यमापन करताना गोष्टींबद्दल विचार करणे हा मानवी स्वभाव आहे.

प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात चढ-उतार हे सुरूच असतात. पण काही जणांना आपल्या जीवनाविषयी फार तक्रारी असतात. त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना जड होऊ लागतात. याच तणावात ते आपल्या आयुष्यातील आनंद, उत्साह हरवून बसतात व नेहमी आपल्याच विचारात बुडालेले असतात. आणि सतत विचार करूण त्यांना ओव्हरथिंकिंग सारखी समस्या निर्माण होते.

वाचन करणे, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे आणि अन्य अनेक कारणांमुळे अनेकांना खूप जास्त विचार करण्याची सवय जडते. अशा माणसांना एक मिनिट देखिल शांत राहता येत नाही. त्यांना खूप त्रास होतो.

यावर उपाय म्हणून योगासन प्राणायाम याकडे हे लोक वळतात. मात्र एवढे करूनही अनेकांची खूप जास्त विचार करण्याची सवय जात नाही. योगासन प्राणायाम यांच्यामुळे थोडावेळ साठी विचारांची गती कमी होते.

हे साधे उपाय करून पाहा

श्वासावर लक्ष द्या

दर दोन तासातून 5 मिनिटे स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. घड्याळात वेळ लावून किंवा मोबाईममध्ये अलार्म लावून मोजून 5 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष द्या. लक्षात घ्या तुम्हाला प्राणायाम करायचा नाही. फक्त श्वासावर लक्ष द्यायचे आहे.

श्वास मोजणे

तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर श्वास मोजणे हा एक चांगला प्रभावी उपाय आहे. विशेष करून रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून श्वास उलटे मोजायचे आहे. म्हणजे 100, 99, 98 असे करत एक पर्यंत यायचे. किमान 5 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT