Physical Relation google
लाइफस्टाइल

Physical Relation : लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी केलेली ही कृती ठरेल धोकादायक

खरेतर शरीरसंबंध ही मानवी शरीराची गरज आहे असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही.

नमिता धुरी

मुंबई : जोडीदार जवळ असला की, त्याच्यासोबत वेळ घालवणे कोणाला आवडत नाही. दोन शब्द प्रेमाचे व सुखद अनुभव घ्यायला प्रत्येकालाच आवडते. कोणत्याही नात्यात शारीरिक किंवा भावनिकरित्या आपण जोडले जातो पण ते नाते प्रेमाचे असेल तर तिथे किंचित का होईना शरीरसुख येतेच.

खरेतर शरीरसंबंध ही मानवी शरीराची गरज आहे असे म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही. शरीर संबंध ठेवताना आपल्या जोडीदाराला संतुष्ट करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. त्यातील काहींना यश मिळते व काहींना अपयश येते.

आपल्या जोडीदाराला लैंगिक सुख मिळाले नाही तर तो आपल्याला सोडून जाणार नाही याबाबत अनेकांना शंका वाटणे साहजिकच आहे. त्यासाठी ते अनेक उपाय करतात ज्याचा काही प्रमाणात फायदा होतो तर कुठेतरी नुकसान. याबाबतीत काही माहीत नसल्यामुळे मनात विविध प्रश्न निर्माण होतात व आपण चुकीचे पाऊल उचलून आपले लैगिंक जीवन खराब करतो.

कधी कधी आपली लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी आपण काही सर्च माध्यमांची मदत घेतो. त्यातून कधी तरी आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळते तर कधी मिळत नाही. त्यामुळे आपण अशा काही सामान्य चुका करतो ज्याचा आपल्या शरीरावर आणि लैंगिक जीवनावर वाईट परिणाम होतो.

१. अतिरिक्त गरम पदार्थांचे सेवन -

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी पुरुष शरीरात ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करतात परंतु, त्याचे अतिसेवन केल्यास शरीरावर परिणाम होतो. शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी फ्लेक्ससीड, सुंठ आणि अंडी इत्यादींचे सेवन केले जाते.

२. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन टाळणे -

लैंगिकतेविषयी अपूर्ण माहिती असल्यामुळे आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे टाळले जाते. ज्यामुळे अशक्तपणा किंवा इतर आजारांच्या समस्या उद्भवू लागतात. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

३. दारुचे सेवन -

अनेकांना असे वाटते दारूच्या सेवनाने लैंगिक क्षमता वाढते पण हे चुकीचे आहे. काही अंशी याचा आपल्याला फायदा होईल परंतु, शरीराला नुकसान देखील होते.

४. औषधांचे सेवन -

चांगल्या लैंगिक जीवनासाठी अनेक वेळा गरज नसताना लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधांचे सेवन केले जाते. ज्याचा शरीरावर परिणाम होतो. जाहिरातीत दाखवलेल्या कोणत्याही औषधाला बळी पडू नका.

५. इतर चुका -

तसेच लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी बरेच लोक औषधी वनस्पती किंवा इतर गोष्टींवर विश्वास ठेवतात. तर काही लोक विदेशी कंपन्यामार्फत मिळणाऱ्या औषधांवरही विश्वास ठेवतात ज्यामुळे लैंगिक क्षमता वाढत नाही परंतु, इतर अनेक समस्यांना बळी पडावे लागते. त्यासाठी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Jobs: तब्बल २३ वर्षांनंतर मोठा बदल! महाराष्ट्रात ८,६६९ सरकारी पदांसाठी भरतीची घोषणा; अर्ज प्रक्रिया कधीपासून?

8th Pay Commission Salary Hike : आठवा वेतन आयोग लागू झाल्यास फरक मिळणार? कोणाला किती पगार वाढणार जाणून घ्या आकडेवारी

SRH vs PBKS Live: अभिषेक शर्माची क्रांती! IPL मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम केला; वैभव सूर्यवंशी या विक्रमात पाचव्या क्रमांकावर

Yuzvendra Chahal पुन्हा वादात! कार चालवत असतानाच रस्त्यात फेकली सिगारेट अन् मग... Video Viral

अपडेटनंतर मोबाईल होत आहेत निकामी; सतत हँग होऊन अनेक अडचणी; ग्राहक चिंतेत, पाहा तुमच्याकडे 'हा' फोन आहे का?

SCROLL FOR NEXT