PM Modi Visited Amman Temple: Sakal
लाइफस्टाइल

PM Modi Visited Amman Temple: नरेंद्र मोदींनी भगवती अम्मान मंदिराला दिली भेट, पुजा थाळीत वापरलेल्या लाल केळींची काय आहेत वैशिष्ट्ये

PM Modi Visited Kanniyakumari: भगवती अम्मान मंदिरात पंतप्रधान मोदी यांनी पूजा केली.त्यादरम्यान त्याच्या हातातील पूजाथाळीत लाल केळी आणि नारळ दिसले आहे. पिवळ्या आणि लाल केळीमध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथे पोहोचले आहे. येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानमुद्रेत बसले आहे. ते ४५ तास ध्यान करणार आहेत. त्यापुर्वी मोदींनी भगवती अम्मान मंदिरात जाऊन प्रार्थना केली. मोदींच्या हातात दिसलेल्या पूजा थाळीमध्ये काही लाल केळी आणि नारळ दिसले आहे. तुम्हाला पिवळ्या आणि लाल केळीचे फायदे आणि फरक माहिती आहे का? नसेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

केळी खाणे आरोग्यदायी असते. अनेक लोक केळीचे सेवन करतात. केळीचे लाल आणि पिवळी अशी दोन प्रकार आहे. या दोन प्रकारांमध्ये कोणता फरक आहे हे जाणून घेऊया.

रंग आणि आकार

पिवळी केळी त्यांच्या पिवळ्या सालीसाठी प्रसिद्ध आहेत. ही केळी मध्यम आकाराची असून बहुतांश बाजारपेठेत सहज मिळतात. तर लाल केळी आकाराने थोडी लहान आणि जाड असतात.

चव कशी असते

पिवळी केळी गोड असतात आणि त्यांची चव बहुतेक लोकांना आवडते. लाल केळीची चव किंचित गोड आणि मलईदार असतात. त्यांना सौम्य बेरीसारखा सुगंध देखील असतो. या खास चवीमुळे लाल केळी आवडीने खाल्ले जातात.

केळीमध्ये असलेले पोषक घटक

लाल आणि पिवळ्या केळीमध्ये भरपूर पोषण घटक असतात. परंतु त्यांच्यात काही फरक आहेत: पिवळ्या केळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 आणि उच्च पोटॅशियम असते. हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे आणि पचनास मदत करतो. लाल केळीमध्ये पिवळ्या केळीपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

लाल आणि पिवळ्या केळींचा वापर

पिवळ्या केळींपासून स्मूदीज, चिप्स, हलवा यासारथे अनेक पदार्थ बनवले जातात. ही केळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहेत. लाल केळी देखील तत्सम पदार्थांमध्ये वापरली जाऊ शकतात, परंतु अनेकवेळा हे फळ तसेच खाल्ले जातात किंवा विशेष मिष्टान्नांमध्ये वापरले जातात.

कुठे मिळतात

पिवळी केळी कुठेही सहज मिळतात आणि वर्षभराच्या कोणत्याही ऋतूत मिळू शकतात. लाल केळी काही प्रमाणात दुर्मिळ आहेत आणि प्रामुख्याने उष्णकटिबंधीय भागात आढळतात. या केळींचे पिक विशेषत: दक्षिण-पूर्व आशिया, भारत आणि आफ्रिकेत घेतले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

Pune News : कालबाह्य चीज, चढ्या दराने पनीर, शाम्पू विकणे पडले महागात

SCROLL FOR NEXT