लाइफस्टाइल

Rose Day 2024 : प्रेमाचंं प्रतीक असतं गुलाब, मात्र प्रत्येक रंगाचा आहे वेगळा अर्थ! देताना करा दोनदा विचार

गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा आहे वेगळा अर्थ; जाणून घ्या

Aishwarya Musale

दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो. जगभरातील जोडपी विविध पद्धतीने व्हेलेंटाईन चा आठवडा साजरा करतात. व्हॅलेंटाईन आठवडा एक आठवड्यापूर्वी सुरू होतो, ज्यामध्ये प्रत्येक दिवस खास असतो. पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे.

गुलाब हे प्रेम व्यक्त करण्याचे एक सुंदर माध्यम आहे. याशिवाय, गुलाब इतर अनेक भावना व्यक्त करण्यास सक्षम आहे. वेगवेगळ्या रंगांचे गुलाब देऊन तुम्ही तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे हे अनेकांना माहीत असेल. पण पिवळे, केशरी आणि गुलाबी गुलाब कोणाला दिले जातात आणि त्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा अर्थ जाणून घेऊया.

लाल गुलाब

लाल गुलाब हा प्रेम, उत्कटता आणि भावनांशी संबंधित असल्याचे मानले जाते. लाल गुलाबाची खासियत म्हणजे तो देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून देऊ शकता

पांढरा गुलाब

पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. पांढरा गुलाब हे शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा आकर्षण असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा गुलाब दिला पाहिजे.

गुलाबी गुलाब

गुलाबी गुलाब फक्त सुंदर दिसत नाही, तर त्याच्या रंगालाही विशेष अर्थ आहे. गुलाबी रंगाचे गुलाब हे तुम्ही तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला देऊ शकता. तसेच जर एखाद्या व्यक्तीचे तुम्हाला आभार मानायचे असतील तर तुम्ही गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता. 

पिवळा गुलाब

रोज डे च्या दिवशी पिवळे गुलाबही देऊ शकता. पिवळे गुलाब हे मैत्रीचे प्रतीक आहे. हे गुलाब देऊन तुम्ही मैत्री करु शकता. ज्या व्यक्तीशी तुम्हाला मैत्री करायची आहे, त्या व्यक्तीला पिवळ्या रंगाचे गुलाब देऊन माझ्याशी मैत्री करशील का अशी विचारणा करु शकता. 

केशरी गुलाब

या रंगामागे देखील एक सुंदर असा अर्थ दडला आहे. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीसोबत मैत्रीच्या एक पाऊल पुढे जायचे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ऑरेंज रंगाचे गुलाब देऊ शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT