लाइफस्टाइल

Health Care News : केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आरोग्यावरही होतो साखरेचा परिणाम; जाणून घ्या कसं..

केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आरोग्यावरही होतो साखरेचा परिणाम

Aishwarya Musale

साखर हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. अनेक पदार्थांमध्ये साखर हा महत्वाचा घटक असतो. गोड पदार्थ असो, चहा असो किंवा कॉफी असो, दिवसभरात कोणत्या ना कोणत्या कारणाने साखर पोटात जाते. अनेकांना त्याची चव खूप आवडते. जे लोक मिठाई खाण्याचे शौकीन असतात ते अनेकदा गोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करू लागतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचते.

मूडमध्ये बदल होऊ शकतात

जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या मूडमध्ये बदल होऊ शकतात. जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने मूड स्विंग, चिंता आणि नैराश्य येऊ शकते. तसेच साखरेच्या अतिसेवनामुळे, तुम्हाला थकवा, चिडचिड आणि अधिक तणाव जाणवू लागतो.

साखरेचे व्यसन

साखरेच्या अतिसेवनामुळे मेंदूमध्ये सूज येऊ शकते, तसेच त्यामुळे क्रेविंग्स आणि व्यसनासारखी लक्षणे उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

ब्रेन फॉग

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने तुमचे कॉग्नेटिव फंक्शन बिघडू शकते. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते.

तसेच, साखर कमी प्रमाणात तुमच्यासाठी चांगली असते, पण जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. पुरळ येऊ शकते, टाइप 2 मधुमेह होऊ शकतो आणि अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

जास्त साखर खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. यामध्ये हृदयविकाराचाही समावेश होतो. जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा आणि जळजळ तसेच ट्रायग्लिसराइड्स, रक्तातील साखर आणि रक्तदाब पातळी वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT