लाइफस्टाइल

Waxing Tips : वॅक्सिंग केल्यानंतर या 5 गोष्टी करू नका, त्वचा पडू शकते काळी..

वॅक्सिंग केल्यानंतर या 5 गोष्टी करू नका, जाणून घ्या

Aishwarya Musale

त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी नियमित क्लीन्जिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणं आवश्यक असतं. या स्कीन केअर रूटीनबरोबरच त्वचेवरचे अनावश्यक केस काढून टाकणंही गरजेचं असतं. शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी महिला वॅक्सिंग करतात. वॅक्सिंग केल्याने त्वचेवरचे नको असलेले केस निघतात आणि त्वचाही स्वच्छ दिसते.

हे करताना खूप वेदना होतात पण त्यानंतर त्वचा पूर्णपणे मऊ होते. बरेच लोक असे असतात की वॅक्सिंग केल्यानंतर त्यांची त्वचा काळी पडू लागते. आज आम्ही तुम्हाला वॅक्सिंगनंतर कोणती कामे करू नयेत ते सांगणार आहोत.

1. काही लोकांसोबत असेही दिसून आले आहे की वॅक्सिंग केल्यावर त्वचा जास्त काळवंडते. असे होऊ नये असे वाटत असेल तर वॅक्सिंग केल्यानंतर खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये, थंड पाण्याचा वापर करावा.

2. वॅक्सिंग केल्यानंतर आपली त्वचा खूप नाजूक होते, त्यामुळे तिची खूप चांगली काळजी घेतली पाहिजे. आपण जास्त सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळला पाहिजे. कारण त्यामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते. टॅनिंगसह तुम्हाला रॅशेस देखील येऊ शकतात.

3. अनेक लोक वॅक्सिंगनंतर बॉडी स्क्रब करून घेतात, परंतु तुम्ही असे करू नये. ते तुमची त्वचा खराब करते. वॅक्सिंग केल्यानंतर म्हणजे ३-४ दिवस तुम्ही काहीच करू नये. जर तुम्ही स्क्रबऐवजी बेबी शॉप वापरत असाल तर ते तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहे, ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवत नाही.

4.असे बरेच लोक आहेत जे वॅक्सिंग करून घेतात पण त्यांची त्वचा खूप खराब दिसू लागते. तुम्ही तुमच्या त्वचेवर अशी कोणतीही केमिकल वस्तू लावू नये, ज्यामुळे तुमची त्वचा खूप खराब होते.

5. जेव्हा तुम्ही वॅक्सिंग कराल तेव्हा तुम्ही त्या भागाला अजिबात खाजवू नये. असे केल्याने खाज आणि लालसरपणाची समस्या लक्षणीय वाढते. आपण आपल्या पायांना आणि हातांना जास्त स्पर्श करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT