Skin Care sakal
लाइफस्टाइल

Skin Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी घरच्या घरी बनवा तांदळाचं स्क्रब

तांदळाच्या पिठाने उजळेल त्वचा अन् पिंपल्स होतील दूर; घरच्या घरी बनवा तांदळाचं स्क्रब

Aishwarya Musale

दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि आपण सर्वांनी त्याची तयारी सुरू केली आहे. साधारणपणे दिवाळीच्या आधी आपण घराची साफसफाई करायला सुरुवात करतो, पण आपली त्वचा स्वच्छ करण्याचे काय? दिवाळीत जसे तुमचे घर चमकते, त्याचप्रमाणे तुमची त्वचाही चमकणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला फॅन्सी उत्पादने खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तांदळाच्या पिठाच्या मदतीने तुमची त्वचा घरच्या घरी एक्सफोलिएट करू शकता.

जेव्हा तुम्ही स्किनला स्क्रब करता तेव्हा ते केवळ डेड स्किन सेल्स काढून टाकत नाही. त्याऐवजी, ते तुमच्या त्वचेतील कोणत्याही प्रकारची घाण काढून टाकण्यास मदत करते आणि यामुळे तुमची त्वचा चमकते. तर आम्ही तुम्हाला तांदळाच्या पिठाच्या मदतीने बनवलेल्या काही फेस स्क्रबबद्दल सांगत आहोत.

तांदळाचे पीठ आणि ओट्स घालून स्क्रब बनवा

ओट्स एक उत्कृष्ट एक्सफोलिएटिंग एजंट म्हणून ओळखले जातात, म्हणून तुम्ही तांदळाच्या पिठात ओट्स मिक्स करून उत्कृष्ट स्क्रब तयार करू शकता.

आवश्यक साहित्य-

  • एक चमचा तांदळाचे पीठ

  • एक चमचा ओट्स

  • एक चमचा दूध

  • एक चमचा मध

वापरण्याची पद्धत-

  • सर्वप्रथम तांदळाचे पीठ, ओट्स, दूध आणि मध एकत्र करा.

  • आता ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि अगदी हलक्या हातांनी गोलाकार हालचालीत स्क्रब करा.

  • आता 10 मिनिटे असेच राहू द्या.

  • शेवटी, त्वचा धुवा आणि नंतर ते मॉइस्चराइझ करण्यास विसरू नका.

तांदळाचे पीठ आणि गुलाब पाण्याने फेस स्क्रब बनवा

हा एक फेस स्क्रब आहे जो डेड स्किन काढून टाकते. तुमची स्किन टॅन झाली असेल तर हा फेस स्क्रब तुमच्यासाठी खूप चांगला असेल.

आवश्यक साहित्य-

  • दोन चमचे तांदळाचे पीठ

  • गरजेनुसार गुलाबपाणी

वापरण्याची पद्धत-

  • सर्व प्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी घालून मिक्स करा.

  • आता हे मिश्रण तुमच्या त्वचेवर लावा आणि हलक्या हातांनी एक्सफोलिएट करा.

  • आता दहा मिनिटे त्वचेवर राहू द्या.

  • शेवटी, पाण्याच्या मदतीने त्वचा स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT