Smartphones deteriorating due to sanitizer 
लाइफस्टाइल

सॅनिटायझरच्या मदतीने मोबाईल साफ करत आहात तर वेळीच थांबा. अन्यथा हे होईल

प्राजक्ता निपसे

पुणे : भारतासह जगभरात कोरोना व्हायरसची रुग्ण संख्या वाढत असून , जगातील सर्वच देश आपल्या नागरिकांना कोरोनाच्या  काळात साबन अथवा सॅनिटायझरने हात धुणे इत्यादी सल्ला देतात. लोक सॅनिटायझरचा वापर अगदी मोबाईल फोन साफ  करण्यासाठीही करत आहेत.अनेक लोक आपला फोन सॅनिटायझर करण्यासाठी अँटी बॅक्टेरिअल वेट-वाइप्सदेखील वापरत आहेत. तर काही लोक असेही आहेत, जे फोन स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनेटायझरचा वापर करतात. 

या लोकांना हेच माहित नाही कि सॅनिटायझरमुळे फोनचे काय नुकसान होते, खरे तर सॅनिटायझर वापरल्याने फोनच्या स्क्रीनसोबतच हेडफोन जॅक आणि स्पीकरदेखील खराब होतात .काही मोबाईल दुरुस्त करणारे लोक सांगतात, की सध्या त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी येत असलेले अधिकांश मोबाईल सॅनिटायझरमुळेच खराब झालेले आहेत. त्यांनी सांगितले, की मोबाईलला सॅनिटायझर लावताना लोकांकडून अनेकवेळा मोबाईलच्या हेडफोन जॅकमध्ये सॅनिटाईझर जाते. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन तो फोन खराब होत आहेत.

इतकेच नाही, तर अनेक लोकांच्या फोनचे डिस्प्ले आणि कॅमऱ्याच्या लेन्ससुद्धा सॅनिटायझरमुळे खराब झाल्या आहेत. तर मग आम्ही तुम्हाला मोबाईल स्वच्छ करण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. 

मेडिकल वाइप्सने सफाई 

मोबाईल स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही ७० टक्के अल्कोहोल असलेल्या मेडिकल वाइप्सचा वापर करता येणारं आहे. याच्या सहाय्याने तुमचा फोन व्यवस्थित स्वच्छ होईल.

कापसाद्वारे 

आधी तुमचा फोन स्विच ऑफ करा. यानंतर कापसाचा एक तुकडा रबिंग अल्कोहलमध्ये डीप करून आणि नंतर आपल्या फोनची स्क्रिन सरळ धरून साफ करा. खरे तर, आपण आपल्या मोबाईल कस्टमर केअरवरूनच मोबाईल स्वच्छ करण्याचा सल्ला घेणे योग्य आहे. कारण सर्वच कंपन्यांचे फोन मटेरिअल वेगवेगळे असू शकतात. 

अॅन्टी बॅक्टेरिअल पेपरच्या मदतीने 
बहुतांश मेडिकल्समध्ये तुम्हाला सहजपणे अँटी बॅक्टेरिअल टिश्यू पेपर्स सहज मिळतील. त्याने सुद्धा तुमचा फोन स्वच्छ करू शकतात.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT