Health Care esakal
लाइफस्टाइल

Health Care : दिवसाची सुरूवात करा कोरफड ज्यूसने, तुम्हाला मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

कोरफड ही आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्यासोबतच कोरफड आपल्या आरोग्यासाठी तितकीच उपयुक्त आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : प्रत्येकाचे मॉर्निंग रूटीन हे वेगवेगळे असते. अनेकांची सकाळ ही चहा-कॉफीने होते तर काही जण कोमट पाणी पिऊन त्यांचा दिवस सुरू करतात. या शिवाय, काही जण सकाळी ज्यूस देखील पितात. विविध प्रकारच्या फळांचे ज्यूस पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे, अनेक जण ज्यूस पिऊन त्यांच्या दिवसाची सुरूवात करतात.

कोरफड ही आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्यासोबतच कोरफड आपल्या आरोग्यासाठी तितकीच उपयुक्त आहे.

मात्र, तुम्ही कोरफडचा ज्यूस कधी प्यायला आहात का? जर नसेल प्यायला तर तुमच्या मॉर्निंग रूटीनमध्ये त्याचा समावेश करा. कारण, सकाळची सुरूवात ही कोरफडच्या ज्यूसने केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

ज्या लोकांना मधुमेह आहे, अशा लोकांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आहारात कोरफड ज्यूसचा समावेश करावा. काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, जर तुम्ही ३०० मिलिग्रॅम कोरफडचा ज्यूस दिवसातून दोनवेळा असा ४ आठवड्यांसाठी घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

शिवाय, साखरेचे प्रमाण कमी होण्यामध्ये देखील सुधारणा होते. त्यामुळे, मधुमेह असलेल्या लोकांनी सकाळची सुरूवात ही कोरफड ज्यूसच्या सेवनाने करणे, फायद्याचे ठरते.

पचनक्षमता सुधारते

कोरफडमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. शिवाय, कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी देखील असते. सकाळी कोरफडचा ज्यूस प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय, आपल्या शरीराची पचनक्षमता देखील सुधारते. त्यामुळे, ज्या लोकांना पोटाच्या समस्या किंवा पचनाच्या समस्या आहेत. त्यांनी त्यांच्या मॉर्निंग रूटीनमध्ये, कोरफड ज्यूसचा जरूर समावेश करावा.

शरीराची सूज कमी करते

अनेकांना पित्त झाल्यावर शरीरावर लालसर चट्टे येतात किंवा शरीराला सूज येते. सूज येण्यासोबतच शरीरामध्ये आतून जळजळ होते. अशा स्थितीमध्ये तुम्ही कोरफडच्या पानांचा रस किंवा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला यापासून आराम मिळतो. कोरफडमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म शरीराची सूज कमी करण्यास मदत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT