लाइफस्टाइल

Travel : जगभरातील 'ही' चार ठिकाणं, जिथं होत नाही सूर्यास्त! जाणून घ्या

जगभरातील 'ही' चार ठिकाणं जिथे होत नाही सुर्यास्त...

Aishwarya Musale

तुम्हाला काही अशा जागा माहीत आहेत का, जिथे सूर्य कधीच मावळत नाही ? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. पण हे खरं आहे. या जगात असे काही देश आहेत, जेथे सूर्य मावळत नाही. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. चला आज अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे सूर्य कधीच मावळत नाही.

नॉर्वे- 76 दिवसांचा दिवस

आर्क्टिक सर्कलमध्ये स्थित नॉर्वेला मध्यरात्री सूर्याची भूमी म्हणतात. येथे मे महिन्याच्या अखेरीपासून जुलैपर्यंत 76 दिवस सूर्य कधीच मावळत नाही. नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत सूर्य मावळत नाही. या काळात तुम्ही स्वालबार्डला भेट देऊ शकता.

नुनावुत, कॅनडा- 2 महिन्यांचा दिवस

कॅनडाच्या वायव्य प्रदेशात नुनावुत हे आर्क्टिक सर्कलच्या सुमारे दोन अंशांवर स्थित आहे. या ठिकाणी जवळपास दोन महिने सूर्यप्रकाश मिळतो. तर हिवाळ्यात हे ठिकाण सलग 30 दिवस अंधारात असते.

आइसलँड- संपुर्ण उन्हाळ्याचा दिवस

आइसलँड हे ग्रेट ब्रिटननंतर युरोपमधील सर्वात मोठे बेट आहे. उन्हाळ्यात १० मे पासुन आइसलँडमध्ये जून महिन्याच्या शेवटीपर्यंत सूर्य कधीच मावळत नाही. मध्यरात्री सूर्य पाहण्यासाठी, तुम्ही आर्क्टिक सर्कलमधील अकुरेरी आणि ग्रिम्से बेट या शहराला भेट देऊ शकता.

बॅरो, अलास्का- ३ महिन्यांचा दिवस

मे महिन्याच्या अखेरीपासून ते जुलै अखेरपर्यंत येथे सूर्य मावळत नाही. परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून पुढील 30 दिवस येथे सूर्य उगवत नाही आणि ती ध्रुवीय रात्र म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ हिवाळ्यात संपूर्ण देश अंधारात असतो. बर्फाच्छादित पर्वत आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या हिमनद्यांसाठी लोकप्रिय, हे ठिकाण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात भेट देता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT