Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : कोरड्या त्वचेवर जादूप्रमाणे काम करेल मलई, जाणून घ्या 'हे' फायदे

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि अनेक समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. या कडाक्याच्या थंडीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. थंडीचा आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.

त्वचा कोरडी होणे, त्वचेवर पिंपल्स येणे आणि त्वचा खडबडीत होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी मग, महागड्या लोशन्स आणि मॉईश्चरायझर्सची मदत घेतली जाते.

मात्र, यामुळे, त्वचेला तात्पुरता फरक पडतो. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या ताज्या मलईचा वापर करू शकता. या मलईमुळे त्वचेला अनेक फायदे होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

त्वचा खोलवर स्वच्छ होते

त्वचेवर मलईचा वापर केल्याने त्वचेतील रोमछिद्रे उघडली जातात. या रोमछिद्रांमधून घाण, अतिरिक्त तेल आणि धूळीच्या कणांना काढून टाकण्याचे काम मलई करते.

मलईमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे त्वचा उजळते आणि त्वचेतील रोमछिद्रे स्वच्छ करण्यास मलई मदत करते. रोमछिद्रे स्वच्छ राहिल्यामुळे, त्वचेवर पुरळ येत नाही आणि त्वचेच्या समस्या निर्माण होत नाही.

त्वचा मॉईश्चराईझ राहते

हिवाळ्यात त्वचा अतिशय कोरडी पडते. या कोरड्या त्वचेमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये मलई तुमची मदत करते. मलई ही दूधापासून बनवली जाते. या मलईमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात आढळून येते.

हे लॅक्टिक अ‍ॅसिड आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे, मलईचा चेहऱ्यावर वापर केल्यानंतर चेहरा सॉफ्ट राहण्यास मदत होते आणि त्वचेचे देखील चांगल्या प्रकारे पोषण होते.

चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते

थंडीमुळे चेहऱ्यावरील त्वचा कोरडी होते. या कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर मृत पेशी मोठ्या प्रमाणात जमा होतात. या मृत पेशींमुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज बनते. परंतु, मलईमध्ये असलेल्या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे, त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT