Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : त्वचेवर ग्लो हवाय? मग, चेहऱ्यावर लावा नाचणीचा फेसपॅक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

सध्या सर्वत्र थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्यासोबतच या थंडीचा त्वचेवर आणि केसांवर ही परिणाम होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : सध्या सर्वत्र थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्यासोबतच या थंडीचा त्वचेवर आणि केसांवर ही परिणाम होतो. थंडीमुळे त्वचा कोरडी होणे, त्वचेवर पिंपल्स येणे इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

या समस्यांमुळे त्वचेवरील ग्लो देखील निघून जातो. त्यामुळे, त्वचा निस्तेज दिसू लागते. त्वचेवरील ग्लो नाहीसा होतो. त्वचेवरील हा ग्लो पुन्हा आणण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. महागड्या क्रीम्स, लोशन्स, फेसपॅक्स यांचा वापर करतो. मात्र, तुम्ही नाचणीचा वापर करून त्वचेच्या समस्या दूर करू शकता.

नाचणीचा फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • नाचणीचे पीठ

  • दही

  • लिंबाचा रस

  • मध

नाचणीचा फेसपॅक या पद्धतीने बनवा

नाचणीचा फेसपॅक बनवण्याठी एका बाऊलमध्ये ३ चमचे नाचणीचे पीठ घ्या. त्यात १ चमचा दही मिसळा. त्यानंतर, त्यात लिंबाचा रस (1 चमचा) आणि मध (अर्धा चमचा) घाला. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

परंतु, हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहऱ्याचे आधी स्क्रबिंग करून घ्या. चेहरा चांगल्या प्रकारे स्क्रब केल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर नाचणीचा फेसपॅक लावा. २० ते २५ मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

नाचणीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

मृत त्वचा काढून टाकते

नाचणीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर १०-१५ मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. यामुळे, त्वचेतील रोमछिद्रे स्वच्छ होतात आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

त्वचेला ठेवते हायड्रेटेड

नाचणी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. नाचणीमध्ये आढळून येणारे पोषकघटक हे आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर आहेत.

नाचणीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर हे पोषकघटक आपल्या त्वचेला मॉईश्चराईझ ठेवते आणि त्वचेवर चमक आणण्यास मदत करते. शिवाय, पिंपल्सची समस्या देखील या फेसपॅकमुळे दूर होते. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ वेळा या फेसपॅकचा चेहऱ्यावर वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT