Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेसाठी लाभदायी आहे तिळाचे तेल, अशा पद्धतीने करा वापर

हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्या आणि केसांच्या ही समस्या सुरू होतात. बदलत्या वातावरणाचा परिणाम सर्वाधिक आरोग्यावर, त्वचेवर आणि केसांवर होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्या आणि केसांच्या ही समस्या सुरू होतात. बदलत्या वातावरणाचा परिणाम सर्वाधिक आरोग्यावर, त्वचेवर आणि केसांवर होतो.

त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे हे फार मोठे आव्हान असते. जर तुम्ही हिवाळ्यात त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर त्वचा कोरडी आणि खडबडीत होण्यापासून वाचू शकते.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्वचेसाठी महागडे लोशन्स आणि मॉईश्चरायझर्सचा वापर करण्यापेक्षा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. आज आपण त्वचेसाठी तिळाच्य तेलाचे होणारे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

स्किनकेअर रूटीनमध्ये तिळाच्या तेलाचा वापर

हिवाळ्यात रोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाचा वापर तुम्ही त्वचेवर करू शकता. या तेलाने त्वचेचा मसाज केल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉईश्चराईझ होण्यास सुरूवात होईल. त्वचेवर चमक आणण्यासाठी देखील हे तेल फायदेशीर आहे.

यासाठी तुम्ही ५ चमचे तिळाच्या तेलात २ चमचे हळद मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर, १५-२० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

काळे डाग निघून जातात

तिळाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, हे तेल चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग आणि मुरूमाच्या समस्येपासून आराम देण्यास मदत करते. शिवाय, या तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने त्वचेवरील काळे डाग आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

त्वचेला ठेवते सॉफ्ट

तिळाच्या तेलामध्ये मॉईश्चरायझिंग घटकांचा समावेश आढळून येतो. हे घटक त्वचेची खोलवर सफाई करण्यास आणि त्वचा मऊ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिळाच्या तेलामध्ये कापूस बुडवून हा कापूस चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर, हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा. त्यामुळे, हिवाळ्यातही तुमची त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT