Dark Chocolate Benefits  esakal
लाइफस्टाइल

Dark Chocolate Benefits : निरोगी हृदयासाठी आणि मेंदूसाठी डार्क चॉकलेट खाणे आहे लाभदायी, जाणून घ्या फायदे

हृदयाची आणि मेंदूची काळजी घ्यायची असेल तर डार्क चॉकलेटचे सेवन जरूर करा.

Monika Lonkar –Kumbhar

Dark Chocolate Benefits : चॉकलेट खायला कुणाला आवडत नाही, ते तर सगळ्यांनाच आवडतं. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना चॉकलेट्स खायला आवडतात. त्यातल्या त्यात डार्क चॉकलेट खाणारे अनेक जण आहेत. डार्क चॉकलेटचे आपल्या शरीराला होणारे फायदे देखील अनेक आहेत. कदाचित, हे तुम्हाला माहित असेलच.

डार्क चॉकलेट खाणं हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असतं. मात्र, एका नवीन संशोधनातून असे दिसून आले आह की, डार्क चॉकलेट हे आपला मेंदू तिक्ष्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी लाभदायी आहे.

डार्क चॉकलेटमुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. त्यामुळे, हृदयाची आणि मेंदूची काळजी घ्यायची असेल तर डार्क चॉकलेटचे जरूर सेवन करा. मात्र, डार्क चॉकलेटचे सेवन प्रमाणात करणे महत्वाचे आहे. चला तर मग आज आपण डार्क चॉकलेटचे आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊयात.

डार्क चॉकलेटचे होणारे फायदे खालीलप्रमाणे

तणावाचे प्रमाण कमी करते

डार्क चॉकलेटमध्ये कॅफेनचा समावेश असतो. या कॅफेनमुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते. तणाव कमी करण्यासाठी कॅफेन प्रभावी आहे. डार्क चॉकलेटचे सेवन केल्यामुळे आपला मूड देखील सुधारू शकतो.

शिवाय, डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे घटक तणाव निर्माण करणारे हार्मोन्स नियंत्रित करण्याचे काम करतात. त्यामुळे, तणाव कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर आहे.

निरोगी हृदयासाठी लाभदायी

डार्क चॉकलेटमध्ये समाविष्ट असणारे पोषकघटक आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे, आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. परंतु, डार्क चॉकलेटचे सेवन हे प्रमाणातच करावे.

त्वचेसाठी फायदेशीर

डार्क चॉकलेटचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. डार्क चॉकलेटमध्ये आढळून येणाऱ्या डायट्री फ्लेवनॉल्समुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचेची रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुधारते. त्यामुळे, त्वचेसाठी डार्क चॉकलेटचे सेवन करणे हे फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT