Travel Diaries esakal
लाइफस्टाइल

Travel Diaries : यंदा विदेशात फिरायला जायचय? कोणते देश आहेत सर्वात सुरक्षित? घ्या जाणून

नुकतीच ग्लोबल पास इंडेक्सने जगातील सर्वात सुरक्षित देशांची यादी जाहीर केली आहे. हे सर्व देश या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये भेट देण्यासाठी सर्वात सुरक्षित आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Travel Diaries : या नव्या वर्षात फिरायला जाण्याचे अनेकांनी विविध प्लॅन्स बनवले असतील. कुणी ग्रुपसोबत फिरायला जाणार असेल तर कुणी सोलो ट्रॅव्हलिंगचा प्लॅन केला असेल. मात्र, तुमच्या मनात कुठेतरी सुरक्षिततेबद्दल ही प्रश्न असतील.

जसे की, कोणत्या देशात फिरायला जाणे हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे? असे प्रश्न तुमच्या मनात उमटले असतील. परंतु, आता तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय परदेशात प्रवास करू शकता.

नुकतीच ग्लोबल पास इंडेक्सने जगातील सर्वात सुरक्षित देशांची यादी जाहीर केली आहे. हे सर्व देश या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये भेट देण्यासाठी सर्वात सुरक्षित आहेत. ग्लोबल पास इंडेक्सने जाहीर केलेल्या अहवालामध्ये या देशांमधील वाहतूक, गुन्हेगारी, महिलांची सुरक्षा याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या सर्व आकडेवारीनुसार सुरक्षित देशांची क्रमवारी तयार करण्यात आली आहे. या यादीतील पहिल्या ५ सुरक्षित देशांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

कॅनडा

सुरक्षित देशांच्या या यादीमध्ये उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा या देशाचा सर्वात पहिला क्रमांक लागतो. विशेष म्हणजे या देशात प्रवासी लोकांची संख्या खूप जास्त आहे. हा देश जगातील सर्वात सुरक्षित देश मानला जातो. या वर्षात भेट देण्यासाठी कॅनडा हा सर्वात सुरक्षित देश आहे. यंदा तुम्ही बिनधास्तपणे फिरण्यासाठी या देशात जाऊ शकता.

स्वित्झर्लंड

सुरक्षित देशांच्या यादीमध्ये युरोपातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडचे नाव देखील समाविष्ट आहे. सुरक्षित देशांच्या या यादीमध्ये स्वित्झर्लंड हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर निसर्ग आणि नयनरम्य पर्वतांनी समृद्ध असलेल्या देशाला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.

नॉर्वे

सुरक्षित देशांच्या यादीमध्ये युरोपातील नॉर्वे या देशाचा तिसरा क्रमांक आहे. हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी हा सर्वात सुंदर आणि सुरक्षित देश आहे. दरवर्षी अनेक देशांमधील पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. यंदा फिरायला जाण्यासाठी तुम्ही नॉर्वे या देशाची नक्कीच निवड करू शकता.

आयर्लंड

सुरक्षेच्या दृष्टीने पहिल्या टॉप-५ देशांमध्ये आयर्लंड हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. जर तुम्ही एकटे किंवा जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आयर्लंड या देशाचा पर्याय बेस्ट आहे. मनमोहक निसर्ग, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि निवांतपणा यासाठी हा देश प्रसिद्ध आहे.

नेदरलॅंड

जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीमध्ये नेदरलॅंड या देशाचा ५ वा क्रमांक आहे.  या देशात फिरायला जाणे हे सुरक्षित मानले जाते. निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा देश फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या देशाची निवड करायला काहीच हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Latest Marathi Update Live: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा मांढरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर हवालदारला सीबीआय कोठडी

खेकडेच राहणार तुम्ही... रितेश देशमुखच्या त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांमध्येच जुंपली; चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Rice Theft : गोदामातून तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या तीन महिलांना अटक; मध्यरात्री टेम्पो बोलावून नेली पोती

SCROLL FOR NEXT