Gardening Tips esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, झाडे होतील हिरवीगार

झाडांची काळजी घेणे म्हणजे केवळ झाडांना पाणी घालणे असे होत नाही. तुम्ही नियमितपणे झाडांना पाणी घालत असाल आणि तरी देखील झाडे सुकल्यासारखी दिसत असतील, तर झाडांना फक्त पाणी गरजेचे नाही.

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : झाडांची काळजी घेणे म्हणजे केवळ झाडांना पाणी घालणे असे होत नाही. तुम्ही नियमितपणे झाडांना पाणी घालत असाल आणि तरी देखील झाडे सुकल्यासारखी दिसत असतील तर झाडांना फक्त पाणी गरजेचे नाही. त्यासोबत झाडांना इतर गोष्टींची ही आवश्यकता किंवा समस्या असू शकते.

आज आपण झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? किंवा झाडांची देखभाल कशा प्रकारे केली पाहिजे? याबद्दलच्या टिप्स जाणून घेणार आहोत.

सूर्यप्रकाश आवश्यक

झाडांसाठी सूर्यप्रकाश अतिशय महत्वाचा आहे. कारण, ऊन मिळाल्यावर झाडांमध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. ज्याला प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) असे म्हटले जाते. शिवाय, झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यावर झाडे छान बहरतात आणि फुलतात. त्यामुळे, झाडांसाठी सूर्यप्रकाश महत्वाचा आहे. मात्र, झाड जास्त वेळ ऊन्हात ठेवू नका, अन्यथा झाडाचे नुकसान होऊ शकते.

झाडांसाठी खत महत्वाचे

वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी खत अतिशय फायदेशीर आहे. थोडक्यात खत हे झाडांसाठी एकप्रकारचे प्रोटीन आहे. त्यामुळे, झाडांना अवश्य खत घाला. शक्यतो विकतचे खत आणू नका. त्यामध्ये, अनेक केमिकल्सचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, शक्यतो फळे, ओला कचरा आणि शेणापासून बनवले जाणारे कंपोस्ट खत  यांचा वापर करा. नैसर्गिक खतामुळे झाडांना कोणतीही हानी होत नाही.

झाडांची करा छाटणी

तुमच्या झाडाचा कोणताही भाग हा जर सडलेला किंवा खराब झालेला असेल तर त्या भागाची छाटणी करा. अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे, संपूर्ण झाड खराब होण्याचा धोका निर्माण होतो. झाडांची छाटणी केल्याने झाडांची योग्य प्रकारे वाढ होण्यास मदत होते.

कीटकनाशकांचा करा वापर

अनेकदा झाडांना कीड लागते. कीड लागल्यावर मग झाडांची वाढ खुंटते. झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि त्यांना कीड लागू नये, यासाठी महिन्यातून १ ते २ वेळा झाडांवर कीटकनाशक फवारा. मात्र, जास्त प्रमाणात झाडांवर कीटकनाशकांचा फवारा करणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

Friendship Story: रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री श्रेष्ठ! देश-विदेशातून 54 डॉक्टर मित्र एकवटले; दिवंगत मित्राच्या कुटुंबासाठी 18 लाख जमवले

ENG vs PAK: इंग्लंडसमोर पाकिस्तानचे लोटांगण! जो रुटच्या संघाचा लॉर्ड्सवर दणदणीत विजय, WTC Points Table मध्येही फायदा

Marathi News Live Updates : 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार स्वीकारा; इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - मोहन भागवत

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

SCROLL FOR NEXT