Healthy Foods esakal
लाइफस्टाइल

Healthy Foods : वर्किंग वुमनने हेल्दी राहण्यासाठी आहारात समाविष्ट करावेत 'हे' खाद्यपदार्थ

आहाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Foods : वर्किंग वुमनकडे फार कमी वेळ असतो. त्यांना घरातील जबाबदारी सांभाळून स्वत:च्या कामाकडे ही लक्ष द्यावे लागते. थोडक्यात त्यांच्याकडे दुप्पट जबाबदारी असते. मात्र, या सगळ्या गडबडीमध्ये नोकरदार महिलांचे स्वत:च्या आहाराकडे प्रचंड दुर्लक्ष होते.

आहाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मग विविध प्रकारच्या समस्या महिलांच्या मागे लागतात. जर या समस्यांपासून दूर रहायचे असेल तर तुमचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण ही पौष्टिक असणे गरजेचे आहे. यामुळे, तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

आज आम्ही खास वर्किंग वुमनच्य आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या हेल्दी आणि टेस्टी खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत. हे खाद्यपदार्थ आहारात समाविष्ट केल्यास याचा नोकरदार महिलांना नक्कीच फायदा होईल. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

बदाम

सर्वात आरोग्यदायी असणाऱ्या नट्समध्ये बदाम या ड्रायफ्रूट्सचा प्रामुख्याने समावेश आढळून येतो. बदामामध्ये प्रोटिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. प्रोटिन्ससोबतच मिनरल्स, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, बदामाचा आहारात जरूर समावेश करा.

मूठभर बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला 20% मॅग्नेशिअम मिळते. हे खनिज आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते. त्यामुळे, शरीराला ताकद मिळते.

बेरी

बेरीज आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. बेरीजमध्ये अनेक प्रकार आहेत. ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी इत्यादी अनेक प्रकार बेरीजमध्ये आढळून येतात.

बेरीजमध्ये जळजळविरोधी गुणधर्म आढळून येतात. त्वचेसाठी आणि एकूण आरोग्यासाठी बेरीज अतिशय फायदेशीर आहेत. बेरीजमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

ओटमील्स

ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, अनेकांच्या आहारात ओट्सचा समावेश आढळून येतो. ओटमील अर्थात ओट्सच्या पीठामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते.

ओट्स किंवा ओटमील्स खाल्ल्याने दिवसभर पोट भरलेले राहते. त्यामुळे, ओट्स आणि ओटमील्सचा नोकरदार महिलांच्या आहारात जरूर समावेश असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT