Gardening Tips  esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी लावलीच पाहिजेत ‘ही’ झाडे

घरामध्ये आपण अनेक प्रकारची झाडे लावतो. अशा प्रकारच्या झाडांना इन-डोअर प्लॅंट्स असे ही म्हटले जाते. या झाडांमध्ये काही झाडे अशी आहेत की, जे आपल्या घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : घरामध्ये आपण अनेक प्रकारची झाडे लावतो. अशा प्रकारच्या झाडांना इन-डोअर प्लॅंट्स असे ही म्हटले जाते. या झाडांमध्ये काही झाडे अशी आहेत की, जे आपल्या घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. काही झाडे चांगली झोप घेण्यास देखील मदत करतात. शिवाय, काही झाडांमुळे आपला मूड देखील सुधारतो, त्यामुळे, आपले मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.

अनेक जण घरामध्ये अशा प्रकारची इनडोअर झाडे लावतात. खरं तर झाडे लावण्याची प्रक्रिया मानसिक थेरपीपेक्षा काही कमी नाही. झाडे लावणे, ती वाढवणे आणि त्यांची काळजी घेणे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

आज आपण घरात लावण्यासाठी कोणती झाडे चांगली आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे, ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि घरातील वातावरण स्वच्छ राहते.

कोरफड

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. या कोरफडीमुळे आपल्या आरोग्याला, त्वचेला आणि केसांना अनेक प्रकारचे फायदे होतात. कोरफडीचा काढलेला गर हा अनेक शारिरीक समस्यांवर रामबाण उपाय आहे.

कोरफड

त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी कोरफडचा आवर्जून वापर केला जातो. यामुळे, त्वचेला आणि केसांना छान चमक मिळते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरात कोरफडीचे झाड लावणे हे फायदेशीर ठरते. (aloevera plant)

बर्ड्स नेस्ट फर्न

या झाडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे झाड पेट फ्रेंडली आहे. या झाडाचा जनावरांना काहीही धोका नाही. हे झाड पेटफ्रेंडली असल्यामुळे, तुम्ही घरामध्ये हे झाड लावू शकता. या झाडामुळे, घरातील हवा शुद्ध आणि खेळती राहण्यास मदत होते.

बर्ड्स नेस्ट फर्न

शिवाय, या झाडाला जास्त सूर्यप्रकाशाची गरज भासत नाही. तुम्ही कमी प्रकाशामध्ये ही हे झाड लावू शकता. या झाडाची जास्त देखभाल करण्याची गरज पडत नाही. (birds nest fern)

स्नेक प्लॅंट

या झाडांची पाने लांब असतात आणि या पानांवर सुंदर अशी डिझाईन असते. त्यामुळे, शोभेचे झाड म्हणून हे झाड घरामध्ये आवर्जून लावले जाते. या झाडामुळे तुमच्या घराला चारचाँद लागतात, यात काही शंका नाही.

स्नेक प्लॅंट

या झाडाची जास्त देखभाल करण्याची गरज पडत नाही. जेव्हा या झाडामधील माती कोरडी होते, तेव्हाच, या झाडामध्ये पाणी घालण्याची गरज पडते. या झाडामुळे घरातील वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होते. (snake plant)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्हांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

SCROLL FOR NEXT