Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : हिवाळ्यात चेहऱ्यावरील पुरळ का वाढतात? अशा पद्धतीने करा बचाव

हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. खास करून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्या चेहऱ्यावर पुरळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. या वाढत्या थंडीचा आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, आरोग्यासोबतच त्वचेवर ही या थंडीचा परिणाम होतो.

त्यामुळे, या दिवसांमध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. खास करून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्या चेहऱ्यावर पुरळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही पुरळांची समस्या गंभीर रूप देखील धारण करू शकते.

त्यामुळे, वेळीच ही समस्या आटोक्यात आणणे महत्वाचे आहे. हिवाळ्यात चेहऱ्यावर पुरळांची समस्या का वाढते? आणि यापासून बचाव कसा करायचा? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

हिवाळ्यात चेहऱ्यावर पुरळांची समस्या का वाढते?

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडायला सुरूवात होते. या कोरड्या त्वचेमुळे सीबमचे उत्पादन वाढते. सीबम हा एक तेलकट पदार्थ आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जेव्हा आपली त्वचा कोरडी होते, तेव्हा आपले शरीर अतिरिक्त प्रमाणात सीबमचे उत्पादन तयार करू लागते. ज्यामुळे, चेहऱ्यावर मुरूमांची आणि पिंपल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

शिवाय, या दिवसांमध्ये अनेक जण गरम पाण्याने बराच वेळ अंघोळ करतात. ज्यामुळे, त्वचेतील हायड्रेशन संपुष्टात येते. त्यामुळे, कोरडेपणा त्वचेमध्ये अधिक प्रमाणात वाढतो आणि चेहऱ्यावर पुरळ वाढतात.

वाढलेल्या पुरळांचा बचाव खालील पद्धतीने करा

चेहऱ्याला वारंवार हात लावू नका

आपल्यातील अनेक जणांना चेहऱ्यावर हात लावण्याची अत्यंत वाईट सवय असते. जेव्हा आपण चेहऱ्यावर हात लावतो, तेव्हा आपल्या उघड्या हातांवर लागलेले हानिकारक जिवाणू हातांवरून चेहऱ्यावर हस्तांतरीत होतात. त्यामुळे, जेव्हा तुम्ही चेहऱ्याला वारंवार स्पर्श करता तेव्हा या जिवाणूंमुळे चेहऱ्यावर संक्रमण होण्याचा धोका वाढतो. परिणामी, चेहऱ्यावरील पुरळांची संख्या देखील वाढते.

त्वचा स्वच्छ ठेवा

वातावरणातील थंडाव्यामुळे आपण या दिवसांमध्ये चेहरा देखील पाण्याने जास्त धुत नाही. त्यामुळे, चेहरा बराच काळ कोरडा राहतो. चेहऱ्याला ओलावा न मिळाल्यामुळे त्वचा आणखी कोरडी होते आणि चेहऱ्यावर मुरूम किंवा पुरळांची संख्या वाढते.

मात्र, जर तुम्ही चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ केला नाही, तर चेहऱ्यावरील धूलिकण, घाण तशीच राहील आणि त्वचेची रोमछिद्रे बंद राहतील. त्यामुळे, त्वचेच्या समस्या अधिक वाढतील. यासाठी तुम्ही त्वचा वारंवार स्वच्छ पाण्याने धुवा किंवा फेसवॉशच्या मदतीने चेहरा धुवायला विसरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

French Open 2026: चार वेळच्या चॅम्पियनला वाढदिवशीच धक्का! इगा स्विअतेकचा फ्रेंच ओपनमधून अनपेक्षित पॅकअप

Viral Video: RCB च्या विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून चाहते झाले वेडे!

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Accident News: मराठा आंदोलनातून परतताना काळाचा घाला; सरडेवाडीतील एकाचा मृत्यू, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT