लाइफस्टाइल

Tinder Leave: कर्मचाऱ्यांना डेटिंगवर जाण्यासाठी सुट्टी देतेय 'ही' कंपनी, खर्चही देणार.. 'लिंक्डइन'वरुन दिली माहिती

Dating App: थायलंड येथील एका कंपनीची पोस्ट लिंक्डइनवर व्हायरल झाली आहे. ज्यात कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी डेटिंग लिव्ह देणार असल्याचं म्हटलं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही कंपनी सहा महिन्यांचं App सब्सक्रिप्शन देणार आहे.

संतोष कानडे

Leave for dating: आजकाल खरं प्रेम दुर्मिळ होत चाललं आहे. खऱ्या प्रेमासाठी लोक काहीही करायला तयार असतात. पण अडचण येते ती वेळेची. हीच अडचण सोडवण्यासाठी एका कंपनीने चक्क डेटिंग लिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने लिंक्डइन अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली.

थायलंड येथील एका कंपनीची पोस्ट लिंक्डइनवर व्हायरल झाली आहे. ज्यात कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी डेटिंग लिव्ह देणार असल्याचं म्हटलं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही कंपनी सहा महिन्यांचं App सब्सक्रिप्शन देणार आहे.

लिंक्डइनवर Whiteline Group ने एक पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. व्हाइटलाईन ग्रुपने म्हटलंय की, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सहा महिने मोफत टिंडर प्लॅटिनम आणि टिंडर गोल्ड सब्सक्रिप्शन देणार आहोत. कुणासोबतही डेटिंग करण्यासाठी आमचे कर्मचारी टिंडर लिव्हचा वापर करु शकतील.

मीडिया रिपोर्टनुसार, जे कर्मचारी आपली टिंडर लिव्ह घेऊ इच्छितात त्यांना एक आठवडा आधी अर्ज करावा लागेल. कंपनीचे कर्मचारी त्यावर कधीही सुट्टी घेऊ शकतील. कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र नेमक्या सुट्ट्यी किती मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये.

टिंडर लिव्ह हा एक नवीन प्रयोग पुढे आलेला आहे. व्हाइटलाईन ग्रुपची त्यामुळे जगभरात चर्चा होत आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, एक कर्मचारी वारंवार डेटिंगमध्ये बिझी राहत असल्याची तक्रार कंपनीकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे कंपनीने ही नवीन पॉलिसी आणली. माणूस प्रेमात असला की खूश राहातो, हाही विचार कंपनीने या निर्णयामागे केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT