Vidhan Sabha Election 2024: 
लाइफस्टाइल

Maharashtra Vidhan Sabha Election : 'या' सुविधांचा लाभ घेऊन अपंग व्यक्तीही बजावू शकतात मतदानाचा हक्क

Vidhan Sabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा आढावा घेण्यात आला आहे. यात अपंग व्यक्तीना कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात सर्वांनाच विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. यासाठी निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले होते. निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर आज मुंबईतील ट्रायंडेट हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रात निवडणूका कधी होणार यावर भाष्य केले आहे. निवडणुका घेण्यास आयोगाने अजून वेळ मागितला आहे. तसेच त्यात त्यांनी अपंग व्यक्तींसाठी खास सुविधांची माहिती दिली आहे. ज्यामुळे मतदानाच्या दिवशी त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

अपंग व्यक्तींना मिळतील पुढील सुविधा

प्रवेशयोग्य मतदान केंद्राची सोय देण्यात येईल.

अपंग असणाऱ्या लोकांना मतदान केंद्रावर व्हीलचेअर आणि स्वयंसेवक सुविधा मिळेल.

तुम्ही अपंग असाल आणि मतदानासाठी मतदान केंद्रवर येऊ शकत नसाल तर घरपोच मतदानाची सोय देण्यात येईल.

अपंग व्यक्तींना मतदानाच्या दिवशी पिक आणि ड्रॉप सुविधा मिळेल.

मतदान केंद्रावर सुविधांचा लाभ घेण्यासाठी सक्षम ॲपचा वापर करू शकता.

राजीव कुमार यांनी सांगितले की, 'आपले मत आपला हक्क' हा कार्यक्रम सुरू आहे. या दौऱ्यात त्यांनी बसपा, आप, सीपीआय, मनसे, शिवसेना, यूबीटी, मनसे अशा 11 पक्षांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सणांची काळजी घ्यावी, असे सर्वांनी मिळून सांगितले आहे.

ते म्हणाले की, निवडणुकीची तारीख मध्यभागी असावी, अशी पक्षांची मागणी आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काही गैरसोयी दिसल्या, मतदारांनी त्यांना सामोरे जाऊ नये. फेक न्यूजच्या प्रसारावर बंदी घालावी. तसेच आम्ही 26 नोव्हेंबर आधी महाराष्ट्रात निवडणुका घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केले आहे. राजीव कुमार म्हणाले, दोन दिवस राजकीय पक्षांशी चर्चा झाली. सण आणि उत्सवानंतर निवडणुका जाहीर कराव्यात, असे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT