Chocolate  sakal
लाइफस्टाइल

World Chocolate Day: एकच चॉकलेट खाऊन मन का भरत नाही? हे आहे शास्त्रीय कारण

चॉकलेट ही अशी वस्तू आहे जी जगात सर्वांनाच आवडते.

Aishwarya Musale

चॉकलेट ही अशी वस्तू आहे जी जगात सर्वांनाच आवडते. माणसाचे वय कितीही असो, त्याला चॉकलेट खायला आवडते. हे मुलांना सर्वात जास्त आवडते. म्हाताऱ्या लोकांनाही जेवण केल्यांनतर काहीतरी गोड खावेसे वाटते म्हणून ते चॉकलेट्स शोधतात.

पण असं का होतं माहीत आहे का? शेवटी त्यात असे काय आहे की लोकांना ते सतत खाण्याची इच्छा होते. आज आम्‍ही तुम्‍हाला याबद्दल सांगणार आहोत, त्‍यासोबतच चॉकलेटचे एडिक्शन काय आहे आणि ते माणसांना कसे होते हे देखील सांगणार आहोत.

तुम्हाला चॉकलेटची सवय का लागते?

चॉकलेटच्या लालसेमागे अनेक गोष्टी असू शकतात. ते गोड असणं आवडतं... पण बहुतेक लोकांना चॉकलेट सतत खाण्याचं लागण्याचं कारण म्हणजे त्यात आढळणारे कॅफिन. चॉकलेटमध्ये कॅफीन आढळते, विशेषतः डार्क चॉकलेटमध्ये.

USDA च्या अहवालानुसार, डार्क चॉकलेटच्या बारमध्ये सुमारे 22.7 मिलीग्राम कॅफिन आढळते. यामुळे, जेव्हा तुम्ही जास्त चॉकलेट खाण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला त्याचे व्यसन लागते. या कॅफिनचा परिणाम लहान मुले, वृद्ध आणि सर्व वयोगटातील लोकांवर होतो.

चॉकलेटच्या ऍडिक्शनपासून कसे बाहेर पडायचे?

कोणत्याही ऍडिक्शनातून बाहेर पडणे सोपे नाही. तुम्हाला ड्रग्जचे व्यसन असो, सिगारेटचे किंवा चॉकलेटचे... जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला आधी तुमचे मन मजबूत करावे लागेल. जेव्हा तुम्ही ते सोडण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्यात असलेले कॅफिन त्याचा प्रभाव दाखवू लागते.

यामुळे तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते, त्याचा परिणाम तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवरही दिसून येतो. यातून बाहेर पडण्यासाठी मन मजबूत करण्यासोबतच दिवसभर भरपूर पाणी प्यावे लागेल. यासोबतच हर्बल टीच्या मदतीने तुम्ही याच्या व्यसनापासून मुक्ती मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT