लाइफस्टाइल

मृत्यूपत्र तयार करताना घ्या काळजी; होणार नाही मुलांमध्ये वाद

भावकीचा वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र तयार करताना घ्या 'ही' काळजी

शर्वरी जोशी

आई-वडिलांच्या पश्चात त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांबाळांच्या नावे होत असते. यात आई-वडिलांनी ज्या मुलाच्या नावावर जी रक्कम किंवा संपत्ती ठेवली असेल तेच त्याच्या वाट्याला येतं. मात्र, अनेकदा या संपत्तीवरुन भावाभावांमध्ये वाद होताना दिसतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की सख्खं नातंदेखील संपुष्टात येतं. त्यामुळेच आपल्या पश्चात मुलांमध्ये वाद होऊ नयेत यासाठी मृत्यूपूर्वीच योग्य पद्धतीने मृत्यूपत्र (will) तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच कोणत्याही मुलावर अन्य होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे मृत्यूपत्र केवळ वयस्क व्यक्तींनीच करावं असं कुठेही नमूद केलेलं नसतं. त्यामुळे जर तुमच्याकडे योग्य संपत्ती आणि पुढे वारसदार असेल तर आजही तुम्ही मृत्यूपत्र तयार करु शकता. त्यामुळेच योग्य मृत्यूपत्र कसं तयार करावं ते पाहुयात. (why-it-is-necessary-to-write-your-will)

कसं करावं मृत्यूपत्र?

१. सगळ्यात आधी तुमची एकूण संपत्ती आणि जबाबदाऱ्या यांची यादी तयार करा. त्यात सारं काही स्पष्टपणे नमूद केलेलं असेल.

२. संपत्ती एखाद्याच्या नावे करण्यापूर्वी त्याच्यात नियम व अटी लागू कराव्यात.

३. तुमच्या पश्चात संपत्तीचा खरा वारसदार कोण हे स्पष्ट शब्दात नमूद करावं.

४. तुमच्या मृत्यूनंतर हे मृत्यूपत्र कोणी वाचावं किंवा कोणी सुपूर्द करावं हे ठरवा. त्या व्यक्तीला तशी कल्पना द्या.

५. जर वारसदार अल्पवयीन असेल तर तो मोठा होईपर्यंत त्याचा गार्डियन कोण हे सांगाव.

६. वरील गोष्टी नमूद करत असताना वकिलांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. वकील कायदेशीर पद्धतीने तुमचं मृत्यूपत्र योग्यरित्या तयार करतील. तसंच संबंधित कायदेदेखील स्पष्ट करुन सांगतील.

७. कधीही मृत्यूपत्र लिहिण्यापूर्वी एखाद्या मृत्यूपत्राचा नमून चेक करुन घ्या. त्यावरुन नेमक्या कशा पद्धतीने हे मृत्यूपत्र तयार करायचं याची कल्पना तुम्हाला येईल.

मृत्यूपत्र तयार झाल्यावर रजिस्टर करा

सगळ्यात महत्त्वाचं मृत्यूपत्र लिहून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून त्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. तसंच ज्या व्यक्ती तुमच्या संपत्तीमधील वाटेकरी नाहीत अशाच व्यक्ती साक्षीदार म्हणून असाव्यात. तसंच मृत्यूपत्राचं रजिस्ट्रेशन करुन घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT