लाइफस्टाइल

'या' चार गोष्टींमुळे महिलांच्या करिअरमध्ये निर्माण होते अडचण

घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळत असताना तिला अनेक अडचणी, अडथळ्यांचा समाना करावा लागतो.

शर्वरी जोशी

२१ वं शतक महिलांच्या (women) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे. याच शतकात महिलांचा खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हटलं जातं. पण, खरंच झाला का? कारण मुलगी शिकली, प्रगती झाली असं आपण कितीही म्हणत असलो तरीदेखील स्त्रियांना, मुलींना हवं तितकं स्वातंत्र्य खरंच मिळतंय का?आज एक स्त्री घर आणि करिअर अशा दोन्ही गोष्टी लिलया सांभाळते. कायम स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. मात्र घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळत असताना तिला अनेक अडचणी, अडथळ्यांचा समाना करावा लागतो. म्हणूनच, स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या चार महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते पाहुयात. (workplace-issues-that-women-face)

१. स्त्री पुरुष भेदभाव -

बऱ्याच ठिकाणी आजही स्त्री-पुरुष भेदभाव केला जातो. यात ऑफिसदेखील अपवाद नाही. महिला कितीही हुशार किंवा कर्तृत्ववान असली तरीदेखील ती एक स्त्री असल्यामुळे तिला डवललं जातं. हे काम तुला जमणार नाही, असं म्हणत तिच्या हातातील काम अन्य पुरुष सहकाऱ्याला दिलं जातं. हा अनुभव आजवर अनेक स्त्रियांना आला असेल. त्यामुळेच महिलांच्या करिअरमधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्त्री-पुरुष भेदभाव.

२. घर -करिअरमधील समतोल राखणे -

घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी सांभाळत असताना स्त्रियांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच जर कुटुंब सहकार्य करणारं असेल तर ठीक. नाही तर आजही अनेक महिला ऑफिसचं काम सांभाळत असताना त्यांचं अर्ध लक्ष घराकडे असतं. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्येही स्त्रियांच्या सोयीनुसार कामाचे तास व शिफ्ट ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतं. परंतु, कुटुंबानेदेखील त्यांना तितकीच साथ देणं गरजेचं आहे.

३. करिअरच्या समान संधी -

बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी सिनिअर लेव्हलच्या जॉब व्हेकन्सी निघाल्या तर तिथे पुरुषांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. परंतु, हे अत्यंत चुकीचं आहे. कोणतीही स्त्री कामाच्या बाबतीत पुरुष सहाकाऱ्यापेक्षा कमी नाही हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिला कामाच्या बाबतीत जास्त प्रामाणिक असतात असंही आढळून आलं आहे.

४. शोषण व अत्याचार -

काम करत असताना महिलांसमोर येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे शारीरिक व मानसिक शोषण. अनेक ठिकाणी महिलांचं शारीरिक व मानसिक शोषण केलं जातं. यात अनेक कंपन्यांमध्ये महिलांनी कितीही जीव तोडून मेहनत केली तरीदेखील पुरुषांच्या तुलनेत तिला कमी मानधन देण्यात येतं.हे एकप्रकारे मानसिक शोषणच आहे. तर, एखाद्या स्त्रीला चारचौघात अनकम्फर्टेबल फिल करुन देणंदेखील लैंगिक शोषणाचाच प्रकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT