Amit Saha  sakal
लोकसभा २०२४

Amit Saha : अणुबाँबची भीती राहुल यांना वाटत असेल ; अमित शहा यांचा टोला,व्याप्त काश्‍मीर परत मिळविण्याचा निर्धार

‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कदाचित ‘अणुबाँब’ची भीती वाटत असेल, भाजपला तशी भीती वाटत नाही,’’ असा टोला आज भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी लगावला.

सकाळ वृत्तसेवा

प्रतापगड (उत्तर प्रदेश) : ‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कदाचित ‘अणुबाँब’ची भीती वाटत असेल, भाजपला तशी भीती वाटत नाही,’’ असा टोला आज भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी लगावला. पाकव्याप्त काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो आम्ही नक्की परत मिळवू, असा विश्‍वासही अमित शहा यांनी व्यक्त केला.

पाकिस्तानकडे अणुबाँब आहे, भारताने त्यांचा आदर करायला हवा,’असे वक्तव्य असलेला काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. आजही उत्तर प्रदेशमधील कौशंबी मतदारसंघातील उमेदवार विनोद सोनकर यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसला धारेवर धरले.

शहा म्हणाले,‘‘राहुलबाबा, तुम्हाला अणुबाँबची भीती वाटत असेल, तर वाटू द्या. भाजपला तशी भीती वाटत नाही. पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर हा पूर्णपणे भारताचाच आहे आणि आम्ही तो निश्‍चितपणे परत मिळवू.’’

‘तीन हॅट्‌ट्रिक हव्यात’

मतदारांना आवाहन करताना अमित शहा म्हणाले,‘‘यंदाच्या निवडणुकीत तीन हॅट्‌ट्रिक होतील, याची काळजी कौशंबीच्या जनतेने घ्यायची आहे. तुम्ही मतदान करून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवा, सलग तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशातून सप, बसप आणि काँग्रेसचा सफाया करा आणि येथील खासदार सोनकर यांना सलग तिसऱ्यांदा संधी द्या.’’ कौशंबीमध्ये निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात, म्हणजे २० मे रोजी मतदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मी मुंबईत नसणार, पण... वाढदिवसाआधी राज ठाकरेंचं मोठं आवाहन; कार्यकर्त्यांना दिला खास संदेश, पोस्टमध्ये काय लिहिलं?

'अल्फा' चित्रपटात आलियासोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; बॉबी देओलसोबत करणार ऍक्शन सीन, तुम्ही ओळखलं का?

Pune Metro Issue : मेट्रो स्थानके यार्डातच! हिंजवडी-बाणेर मार्गावरील स्थानकांची कामे अपूर्ण

Latest Marathi News Live Update : सांगली-तासगाव रस्त्याचे काम संत गतीने, नागरिकांना त्रास

Nanded Crime: प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल घरातून गेली, ती आलीच नाही; नेमकं काय घडलं? सासूने सगळं सांगितलं...

SCROLL FOR NEXT