Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : अमेठी, रायबरेलीकडे मोदींची पाठ;अमित शहांचे रोड शो आणि सभा,उद्याच्या मतदानाकडे लक्ष

देशातील रायबरेली आणि अमेठी या लक्षवेधी मतदारसंघात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या नाहीत. गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही मतदारसंघात रोड शो व सभा घेतल्या.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील रायबरेली आणि अमेठी या लक्षवेधी मतदारसंघात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या नाहीत. गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही मतदारसंघात रोड शो व सभा घेतल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियानातील अंबाला येथे सभा घेतली.

रायबरेली व अमेठी मतदारसंघांमध्ये प्रचार आज संपला. परंतु या प्रचाराच्या दोन आठवड्यात पंतप्रधानांनी या मतदारसंघात सभा किंवा रोड शो केले नाही. भाजपचे स्टारप्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक प्रचारसभा व रोड शो केले आहेत. गांधी कुटुंबाचे मतदारसंघ राहिलेल्या रायबरेली व अमेठीमध्ये मात्र त्यांनी यावेळी जाणे टाळले.

रायबरेलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी मैदानात आहेत तर अमेठीत गांधी कुटुंबाचे विश्वासू किशोरीलाल शर्मा लढत देत आहेत. या मतदारसंघातील प्रचाराची धुरा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांभाळली. गेल्या निवडणुकीत मोदी यांनी अमेठीत प्रचार केला होता. परंतु यावेळी दोन्ही लक्षवेधी मतदारसंघात ते आले नाहीत. या मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविली होती. दोन दिवसांपूर्वीच शहा यांनी रायबरेलीत राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT