Vishwajeet-Kadam sakal
लोकसभा २०२४

काँग्रेस मैत्रीपूर्ण लढतीला तयार, पण 'सांगली'च्या लढतीतून माघार घेणार नाही; विश्‍वजित कदम यांचा थेट इशारा

कोल्हापुरात शाहू महाराज ज्या पक्षातून लढतील, त्या पक्षाला जागा द्यावी, असे ठरले होते.

सकाळ डिजिटल टीम

'आज शिवसेना पक्षाने यादी जाहीर केली, ती महाविकास आघाडीची यादी नव्हे. बाळासाहेब थोरात यांनी त्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.'

सांगली : ‘‘सांगली लोकसभा मतदार संघात (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेनेने (Shiv Sena) मार्ग काढावा; अन्यथा वेळ पडली तर आम्ही मैत्रीपूर्ण लढतीला तयार आहोत,’’ अशी स्पष्ट भूमिका आमदार विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. ‘काँग्रेस सांगली लोकसभा लढणारच,’ याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

ते म्हणाले, ‘‘सांगलीची जागा काँग्रेसने सोडलेले नाही. आज राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांची आम्ही भेट घेतली. सांगलीची जागा पारंपरिक काँग्रेसची आहे. सांगलीने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत सतत काँग्रेसचे खासदार झाले आहेत. सांगली मतदार संघात काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे एक आमदार आहेत. काँग्रेसची येथे ताकद, काम आहे. त्यामुळे महाराष्‍ट्रातील मित्रपक्षांना विनंती करावी आणि सांगलीची जागा काँग्रेसला सोडावी, अशी विनंती राष्ट्रीय नेत्‍यांना केली आहे.

विशाल पाटील, आम्ही सातत्याने सांगलीत कार्यक्रम केले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत ५० हजार लोकांचा मेळावा सांगलीत घेतला. जनसंवाद यात्रा घेऊन जिल्हा पायी पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीत आमचे सदस्य आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.’’

ते म्हणाले, ‘‘आज शिवसेना पक्षाने यादी जाहीर केली, ती महाविकास आघाडीची यादी नव्हे. बाळासाहेब थोरात यांनी त्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना यादीत सांगलीचा समावेश करणे, योग्य नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे कधीही ठरलेले नाही. ते आम्हाला मान्य नाही.

कोल्हापुरात शाहू महाराज ज्या पक्षातून लढतील, त्या पक्षाला जागा द्यावी, असे ठरले होते. शाहू महाराजांनी काँग्रेस पक्ष निवडला. त्यामुळे बदल्यात जागा द्या, असा प्रश्‍नच नाही. हातकणंगले शिवसेनेने लढावी. याबाबत खर्गेसाहेबांनी आश्‍वासन दिले आहे, की काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत चर्चा करतील. मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत.’’ आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

सर्व प्रकारच्या लढाईला तयार - विशाल

विशाल पाटील म्हणाले,‘‘शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांची पहिल्यांदा आघाडी झाली आहे. त्यांची तडजोडीची वेगळी पद्धत असेल. सांगली व अन्य दोन जागांवर तडजोड झालेली नाही. शिवसेनेने परस्पर नाव जाहीर केले असेल तर तो तडजोडीचा भाग असेल. काँग्रेसची पद्धत वेगळी आहे. यातून मार्ग नक्की निघेल, असे शीर्ष नेतृत्वाने आम्हाला सांगितले आहे. आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत. आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आहोत. त्यांचे आदेश आले तर मैत्रीपूर्ण, अमैत्रीपूर्ण, शत्रुत्वाची, सर्व प्रकारच्या लढाईला आम्ही तयार आहोत. आम्ही स्वातंत्र्यापासून काम करतोय. आजोबा वसंतदादांपासून काँग्रेसमध्ये आहोत. पक्षविरोधी भूमिका घेणे, विरोधी पक्षात जाणे, असे होत नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT