Devendra Fadnavis sakal
लोकसभा २०२४

Devendra Fadnavis : काय होतास तू, काय झालास तू : फडणवीस ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ मुंबईतील साकीनाका परिसरात सभा घेतली. या सभेतून देशभक्ती आणि दहशतवादावर भाष्य करताना काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ मुंबईतील साकीनाका परिसरात सभा घेतली. या सभेतून देशभक्ती आणि दहशतवादावर भाष्य करताना काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल केला. काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले.

आपण दहशवाद्यांविरोधात लढा दिला. एक देशाच्या सीमेवर लढणारा आमचा सैनिक होता, दुसरा पोलिस होता, तर आमचा न्यायालयात लढणारा एक सैनिक म्हणजे उज्ज्वल निकम होते, असे म्हणत दहशतवादाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील तोंड बंद करून बसले आहेत. तसेच, उद्धव ठाकरे बोलायला तयार नाही, त्यांना चिंता मुठभर मतांची आहे, म्हणून ते तोंड बंद करून बसले आहेत, असे म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केला. 

ते म्हणाले, की उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली तेव्हा काँग्रेसने फणा काढला, आपल्या हुतात्म्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, दहशतवादी कसाबला फाशी उज्ज्वल निकम यांच्यामुळे फाशी झाली.आधी आपल्या देशात दहशतवादी हल्ले करून जायचे आणि काँग्रेसचे सरकार फक्त निषेध करायचे. मात्र, पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला. त्यामुळेच, २०१९ नंतर आपल्या देशात हल्ला करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT