Hatkanangle Lok Sabha Former MP Raju Shetti esakal
लोकसभा २०२४

'भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळत नाही'; राजू शेट्टींची टीका

रासायनिक खतांवरचे अनुदान कमी करण्याचे धोरण केंद्रातून राबविले जात असल्याने खतांचे दर वाढत चालले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करून, शेतकरी हिताच्या धोरण अंमलबजावणीसाठी स्वाभिमानीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

पुनवत : साखर निर्यातीवर (Sugar Export) बंदीचे धोरण दिल्लीत ठरते. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर होतो. त्यामुळे शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळत नाही. तो मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.

कणदूर (ता. शिराळा) येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गणपत पाटील होते. देवेंद्र धस, पोपट मोरे, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष बंटी नांगरे पाटील, मानसिंग पाटील, शिवलिंग शेटे, चंद्रकांत पाटील, शंकर घोलप, विनायक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत धोरण ठरविले जाते. गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांवरचे अनुदान कमी करण्याचे धोरण केंद्रातून राबविले जात असल्याने खतांचे दर वाढत चालले आहेत. पामतेल आयात धोरण देखील त्याठिकाणीच ठरल्याने, सोयाबीनसारख्या शेतीमालाचे दर कमी झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करून, शेतकरी हिताच्या धोरण अंमलबजावणीसाठी स्वाभिमानीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

यावेळी विक्रम पाटील, सुरेश म्हाऊटकर, संदे, कैलास देसाई, बंटी नांगरे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वसंत पाटील, जयसिंग पाटील, अमोल महाजन, भागवत जाधव, प्रदीप नांगरे, अजित साळुंखे, रघुनाथ पाटील, विनोद पाटील, चंद्रकांत पाटील, अरविंद पाटील, प्रकाश पाटील, सचिन पोखलेकर, विलास पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT