Kiran Samant vs Rajan Salvi esakal
लोकसभा २०२४

..अन्यथा मी लांजा-राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हाचा उमेदवार असेन; किरण सामंतांचा राजन साळवींना थेट इशारा

भविष्यात लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजन साळवी सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, याची मला कल्पना आहे.

रत्नागिरी : मला खासदार करण्यासाठी महायुतीमधील एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस, अजित पवार सक्षम आहेत. राजन साळवींनी (Rajan Salvi) माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी. लांजा-राजापूर विधानसभेची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. साळवी ठरल्याप्रमाणे सातत्याने एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करून धनुष्यबाणावर ही जागा लढावी अन्यथा मी लांजा-राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हाचा उमेदवार असेन, अशा खणखणीत शब्दात किरण सामंत (Kiran Samant) यांनी राजन साळवी यांच्या विधानाचा समाचार घेतला.

किरण सामंतांचे कोकणात चांगले काम आहे. अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्याला किरण सामंत यांनी चोख उत्तर आणि मित्रत्वाचा सल्ला दिला.

सामंत म्हणाले, ‘‘भविष्यात लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली आमदारकी वाचवावी. राजन साळवी सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, याची मला कल्पना आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर मतदारसंघातून धनुष्यबाण या चिन्हाचा उमेदवार असेन.’’

भांडाफोड होण्याची शक्यता

किरण सामंत यांच्या या वक्तव्याने राजन साळवीदेखील राजकीय पटलावर आले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये ते कोणाच्या संपर्कात होते, याचा जणू किरण सामंत यांनी खुलासाच केला आहे. सामंत-साळवी यांच्यातील हे द्वंद्व अनेक राजकीय घडामोडींचा भांडाफोड करणारे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT