Kolhapur Lok Sabha Hasan Mushrif esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : संजय मंडलिकांना मतदान म्हणजे स्व. सदाशिवराव मंडलिकांना वंदन; मुश्रीफांचं मतदारांना भावनिक आवाहन

शाहू महाराजांचा चेहरा पुढे करून आमदार सतेज पाटील खासदारकीही घरात ठेवण्यासाठी धडपडत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

‘मान गादीला- मत मोदींना’ ही टॅगलाईन घेऊन निवडणुकीत उतरलो आहोत.

कडगाव : ‘राजर्षी शाहू महाराजांच्या (Rajarshi Shahu Maharaj) पुरोगामित्वाचा आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जपत स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी वाटचाल केली. त्यांचे आमच्यावर प्रचंड उपकार आहेत. जिल्ह्याच्या विकासातील त्यांचे योगदान मोठे आहे. प्रा. संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्य देऊन स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांना वंदन करूया,’ असे भावनिक आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी काढले.

कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) म्हणाले, ‘माझी उमेदवारी मिळवण्यासाठी मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांचे मोठे योगदान आहे. ‘मान गादीला- मत मोदींना’ ही टॅगलाईन घेऊन निवडणुकीत उतरलो आहोत. केवळ शाहू महाराजांचा चेहरा पुढे करून आमदार सतेज पाटील खासदारकीही घरात ठेवण्यासाठी धडपडत आहेत.

माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील-गिजवणेकर यांचेही भाषण झाले. यावेळी ‘गोडसाखर’चे संचालक बाळासाहेब देसाई, सरपंच अर्चना पाटील, उपसरपंच संजीवनी पाटील, बंटी पाटील, सदानंद पाटील, प्रकाश पताडे, किरण कदम आदी प्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT