Priyanka Gandhi admitted to hospital 
लोकसभा २०२४

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

''मादीजी जेव्हा मुलाखत देतात तेव्हा त्यांचं ते इमोशनल स्पीच नसतं का? आम्ही बोललो तर इमोशनल स्पीच म्हणून हेटाळणी केली जाते. आम्ही खरं बोलतो.. मी १९ वर्षांची असताना वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे घरी आणले होते.. आमचा त्याग आहे, मग मी का बोलणार नाही?''

संतोष कानडे

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. त्यातच प्रियांका गांधीनी आक्रमक पवित्रा घेत भाजपकडून होत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं.

'इंडिया टुडे'च्या मुलाखतीमध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या की, आमच्या कुटुंबाबद्दल सातत्याने अपशब्द बोलले जात आहेत, तरीही आम्ही शांत रहायचं का? माझी शहीद आजी आणि माझे शहीद वडील यांना तुम्ही देशद्रोही म्हणणार आणि आम्ही गप्प रहायचं? असं चालणार नाही.

प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, आमच्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिलं असेल तर आम्हाला लाज वाटयला पाहिजे का? आम्ही शांत का रहायचं? मला गर्व आहे की माझ्या आजीने देशासाठी ३३ गोळ्या खाल्ल्या आहेत. या देशासाठीच माझे वडील शहीद झालेले आहेत.. त्यामुळे मी बोलणार आणि बोलतच राहणार.

''मादीजी जेव्हा मुलाखत देतात तेव्हा त्यांचं ते इमोशनल स्पीच नसतं का? आम्ही बोललो तर इमोशनल स्पीच म्हणून हेटाळणी केली जाते. आम्ही खरं बोलतो.. मी १९ वर्षांची असताना वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे घरी आणले होते.. आमचा त्याग आहे, मग मी का बोलणार नाही?'' असं म्हणत प्रियांकांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.

भाजपकडून होत असलेल्या विधानांवरुन प्रियांका गांधी म्हणाल्या की, तुम्ही म्हणणार माझ्या वडिलांनी कायदे बदलले.. इंदिराजींची संपत्ती विनाकारण घेण्यासाठी कायदा बदलला.. असं म्हणणं वेडेपणा आहे. तुम्ही खोट्यावर खोटं बोलणार आणि आम्ही शांत राहणार? मला माझ्या कुटुंबावर गर्व आहे आणि मला अजिबात त्याची लाज वाटत नाही, असं म्हणत प्रियांका गांधींनी भाजपवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT