Uddhav Thackeray Shahu Chhatrapati Maharaj esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Loksabha : उद्धव ठाकरे आज शाहू महाराजांच्या भेटीला; नवीन राजवाड्यात होणार रणनीतीवर चर्चा

कोल्हापूरची शिवसेनेची जागा कॉंग्रेसला (Congress) आणि सांगलीतील जागा शिवसेनेला देण्याचे जवळजवळ निश्‍चित झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे.

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (ता. २१) महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता नवीन राजवाडा येथे ही भेट होईल. ठाकरे यांची मिरज (जि. सांगली) येथे आज सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी ते कोल्हापुरात विमानतळावर येतील.

तेथून ते मिरजेला जाण्यापूर्वी शाहू महाराजांची भेट घेणार असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. कोल्हापूरची शिवसेनेची जागा कॉंग्रेसला (Congress) आणि सांगलीतील जागा शिवसेनेला देण्याचे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. याच संदर्भातून उद्धव ठाकरे आज मिरज दौऱ्यावर आहेत. तेथे सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे.

दुपारी दोनच्या सुमारास ते मुंबईतून कोल्हापूरकडे विमानाने निघणार आहेत. साधारण तीन-साडेतीनच्या सुमारास ते कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील. तेथून ते थेट नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेण्यास जातील. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत असतील. नवीन राजवाडा येथे निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा होईल. येथील चर्चेनंतर मोटारीने ठाकरे थेट मिरजेला रवाना होतील.

महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून शाहू महाराजांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांना कॉंग्रेसमधून उमेदवारी दिली जाणार असली तरीही ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या ठाकरे गटाची कोल्हापूरची जागा केवळ शाहू महाराज असल्यामुळे कॉंग्रेसला दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT