...मंदिर वहीं बनाऍंगे sakal
लोकसभा २०२४

अशी निवडणूक अशा घोषणा : ...मंदिर वहीं बनाऍंगे

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात लवकरच निवडणूक सुरू होणार आहे. या निवडणूक प्रचारात राम मंदिराच्या आश्वासनाची पूर्तता हा सत्ताधारी भाजपचा अग्रक्रमाचा मुद्दा असेल.

सकाळ वृत्तसेवा

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात लवकरच निवडणूक सुरू होणार आहे. या निवडणूक प्रचारात राम मंदिराच्या आश्वासनाची पूर्तता हा सत्ताधारी भाजपचा अग्रक्रमाचा मुद्दा असेल. यावर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिराच्या उद्‍घाटनाचा जो भव्य सोहळा झाला.

त्याचे कारणच लोकांना दिलेल्या घोषणेची पूर्ती आणि तिचा वापर करून आगामी निवडणूक जिंकणे हे असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवरील वादग्रस्त बाबरी मशिदीचा पाडाव आणि तेथे प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधणे हा भाजपचा गेल्या दहा निवडणुकांतील महत्त्वाचा अजेंडा होता.

या अजेंड्याभोवतीच ‘रामलल्ला आऍंगे, मंदिर वहीं बनाऍंगे’, ही निवडणूक प्रचार घोषणा भाजपने १९८९ च्या निवडणुकीत पहिल्यांदा दिली. भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेत हीच घोषणा पहिल्यांदा ठळकपणे देशभर पोहोचली. परंतु विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आहे या संघटना या घोषणेच्या उद्‍गात्या आहेत.

हा तो काळ होता जेव्हा रामजन्मभूमी आंदोलन तीव्र झाले होते. अयोध्येत, बंदिस्त असलेल्या रामलल्लाच्या मूर्तींचे टाळे काढण्याचा आदेश तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिला होता. मुस्लिम समाजाने या विरोधात जाऊन बाबरी मशीद ॲक्शन कमिटी स्थापन केली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत हा वाद अडकला होता. इकडे मंदिर आंदोलन व रामलल्लांच्या पूजेच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही देशभर विविध उपक्रम आणि आंदोलने सुरू केले. १९८९ च्या पालमपूर अधिवेशनात भाजपने पहिल्यांदा आपल्या निवडणूक घोषणापत्रात या मुद्याचा समावेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT