narendra modi rahul gandhi esakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : मोदींकडून 'शक्ती' शब्दाचा विपर्यास? राहुल गांधी म्हणतात, मला वेगळंच बोलायचं होतं...

Narendra Modi on Rahul Gandhi : ‘‘इंडिया आघाडीचा जाहीरनामा हा शक्ती संपविण्याची भाषा करत असून, ही लोकसभा निवडणूक शक्ती संपवण्याचा संकल्प करणाऱ्यांविरुद्ध शक्तीची उपासना करणाऱ्यांमध्ये होणार आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणमधील सभेदरम्यान केले.

संतोष कानडे

Narendra Modi on Rahul Gandhi : ‘‘इंडिया आघाडीचा जाहीरनामा हा शक्ती संपविण्याची भाषा करत असून, ही लोकसभा निवडणूक शक्ती संपवण्याचा संकल्प करणाऱ्यांविरुद्ध शक्तीची उपासना करणाऱ्यांमध्ये होणार आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणमधील सभेदरम्यान केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘माझ्यासाठी प्रत्येक माता आणि कन्या ही शक्तीचे स्वरूप असून मी त्यांची पूजा करतो. देशाने चांद्रयान-३ चे श्रेय देखील शिवशक्तीला अर्पण केले आणि विरोधक त्याच शक्तीला संपविण्याबद्दल बोलत आहेत.’’ विरोधकांना शक्तीला संपवायचे आहे, तर मी त्यांचे आव्हान स्वीकारतो, मी माझ्या प्राणांची बाजी लावून माझ्या माता भगिनींचे संरक्षण करेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी रविवारी मुंबई येथे झालेल्या सभेमध्ये शक्ती संबंधी केलेल्या विधानाचा संदर्भ घेत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली. हिंदू धर्मामध्ये शक्ती हा शब्द आहे, आम्ही शक्ती विरोधात लढत आहोत. ही शक्ती नेमकी काय आहे? राजाचा जीव ‘ईव्हीएम’ मशिन, ईडी, सीबीआय यांच्यामध्ये असून आम्ही या शक्तीविरोधात लढत आहोत’’ असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा संदर्भ घेत पंतप्रधानांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, पुढे बोलताा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्व देश इंडिया आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असे म्हणत आहे. तेलंगणातही भाजपला पाठिंबा वाढत आहे. तेलंगणात भाजप लाट आहे. त्यामुळे येथे काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती यांचा पराभव होईल. ‘‘काँग्रेस तेलंगणला ‘एटीएम’ मशिन समजत असून येथील सर्व पैसा दिल्लीत जात आहे,’’ असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला.

राहुल गांधींचं प्रत्युत्तर...

मोदींनी शक्ती शब्दाबद्दल केलेल्या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी धर्मिक अर्थाने शक्ती शब्दाचा उल्लेख केलेला नाही. भ्रष्टाचार, असत्य आणि अनीती याबद्दल मी बोललो. मी जे बोलले त्याचा चुकीचा अर्थ सांगितला जातो, असं गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT