Narendra Modi  sakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : काँग्रेसकडून रामाचा अवमान ; पंतप्रधान मोदी,अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेकडे फिरविली पाठ

‘‘काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमध्ये अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून त्यांनी प्रभू श्रीरामाचा देखील अवमान केला आहे,’’

सकाळ वृत्तसेवा

पिलीभीत (उत्तरप्रदेश) : ‘‘काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमध्ये अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून त्यांनी प्रभू श्रीरामाचा देखील अवमान केला आहे,’’ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे आयोजित सभेत बोलताना केली. काँग्रेस पक्ष लांगूलचालनाच्या राजकारणामध्ये आकंठ बुडाला असून त्यातून तो कधीच बाहेर येऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘ अयोध्येमध्ये राममंदिराची उभारणी होऊ नये म्हणून काँग्रेसने अनेकदा प्रयत्न केले. या देशातील जनतेने एक-एक रुपया गोळा करून भव्य मंदिर साकारले तेव्हा त्या पक्षाची सारी पापे विसरून त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते पण या सोहळ्याकडे देखील त्यांनी पाठ फिरविली.

काँग्रेसने प्रभू श्रीरामाचा अवमान केला आहे. काँग्रेसचे जे नेते या सोहळ्याला हजर राहिले त्यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.’’ मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील निशाणा साधला. पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम लीगचे प्रतिबिंब दिसून येते असे ते म्हणाले.

‘‘ प्रत्येक नागरिकाने कुवतीप्रमाणे राम मंदिरासाठी देणगी दिली. पिलीभीतमधील जनतेने एक मोठी बासरी भेट दिली. ‘इंडिया’ आघाडीचे नेते आधी देखील मंदिराचा द्वेष करत असत आणि ही वास्तू उभी राहिल्यानंतर देखील त्यांनी याचा द्वेष केला ,’’ असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री साडे आठ वाजता संबोधित करणार, काय बोलणार?

Sahil Shaikh Story : बापानं गवंडी काम केलं, तर आईनं शेती! लेकानं जिद्दीच्या जोरावर मिळवली खाकी; वाचा पाचवेळा अपयश पचवलेल्या साहिल शेखची प्रेरणादायी यशोगाथा

Latest Marathi News Live Update: पॉश ॲक्टमध्ये बदल होणे गरजेचे - चित्रा वाघ

Parenting Tips : चुकूनही लहान मुलांसमोर करू नका 'या' 5 गोष्टींची चर्चा; नाहीतर लेकरं दुरावतील, आयुष्यभर कुणावर ठेवणार नाहीत विश्वास

वाढलेले केस, सुटलेलं पोट... स्वतःची बॅग स्वतःच घेऊन निघाला ९०चा सुपरस्टार अभिनेता, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT