Narendra Modi sakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : आज नरेंद्र मोदी यांची कन्हानमध्ये सभा ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

नागपूर लोकसभेचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी उद्या बुधवारी (ता.१०) कन्हान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर लोकसभेचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी उद्या बुधवारी (ता.१०) कन्हान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभांचे आयोजन पूर्व विदर्भातील मतदारसंघामध्ये केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी सोमवारी सभा घेतली होती.

उद्या ते पुन्हा विदर्भात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वाजता सभेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्यासह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे तसेच, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव कोहळे मंचावर उपस्थित राहणार आहेत.

कन्हान,ता.९ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (बुधवार,ता.१०) कन्हान येथे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली आहे. सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक ठेवण्यात आली आहे. कन्हान येथील ग्रोमर व्हेंचर्सच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात पथसंचलन केला आहे. चौकाचौकात तगडा बंदोबस्त असून कन्हानकडे येणाऱ्या रस्‍त्यांची नाकेबंदी करीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. सभेला येणाऱ्यांना काही अटींचे पालन करावे लागणार आहे.

जोरदार पाऊस बरसल्याने कार्यकर्त्यांना टेंन्शन

मंगळवारी रात्रीच्या सुमारास रामेटक आणि कन्हान परिसरात जोरदार पाऊस झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळ परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढले आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या अटी

  • सर्वांनी ४.४५ पूर्वी सभास्थळी दाखल व्हावे

  • नागरिकांनी जेवण करूनच सभास्थळी यावे

  • जनतेने सोबत कोणतीही बॅग, पाणी बॉटल, टिफीन डबा, सिगारेट, लॉयटर, दारू बॉटल, इलेक्ट्रॉनिक गाडीची चावी सोबत आणू नये अन्यथा सभास्थळी प्रवेश नाही

  • सभेसाठी येणाऱ्यांनी सोबत काळे कापड, काळा झेंडा आणू नये. तसेच परिधान देखील करून येवू नये. आढळल्यास सभास्थळी नाही

  • सभास्थळापासून आजूबाजूच्या एक किलोमीटर अंतराच्या आतमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांच्याकडे कुणी नातेवाईक, मित्र किंवा पाहुणा म्हणून आल्यास कन्हान पोलिस स्टेशनला माहिती द्यावी

  • जवळील नागरिकांनी सभास्थळी येण्यासाठी वाहनाचा वापर करू नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT