Uddhav Thackeray  sakal
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray : मोदीजी तुम्ही पेपर हाती घेऊन उभे राहा.. उद्धव ठाकरेंनी गजनी सरकार म्हणत पंतप्रधानांना दिले प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला उद्योगपती अदानी-अंबानींकडून गाडी भरून पैसे पाठवण्यात आले आहेत का, असा सवाल केला होता.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला उद्योगपती अदानी-अंबानींकडून गाडी भरून पैसे पाठवण्यात आले आहेत का, असा सवाल केला होता. त्यामुळेच राहुल गांधी यांनी अदानी-अंबानी यांचे नाव घेणे बंद केल्याचे म्हटले होते.

मोदींच्या या भाषणाचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला गाडी भरून पैसै अदानी-अंबानी यांनी पाठवले असतील तर ईडी, सीबीआय चौकशी करण्याचे आव्हान दिले. ठाकरे यांनी दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

कोरोना, हिंदुत्व, अदानी-अंबानी पैसा, मोदींची १० वर्षांची कारकीर्द, नकली शिवसेना आदी विविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मोदींवर पलटवार केला. ते म्हणाले, की ईडी-सीबीआयवाले काय करत आहेत. ईडी-सीबीआयची चौकशी लावा ना, असे आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच, तेव्हा ईडी-सीबीआय काय करत होते, चुना लावून बसले होते का, का ठेल्यावर ईडी, सीबाआयवाले चकना घेऊन बसले होते, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी मोदी यांना केला.

ते म्हणाले, की मोदीजी तुम्ही पेपर हाती घेऊन तुम्ही उभे राहा, २०१४ आणि २०१९ मध्ये तुम्ही दिलेली किती वचने पूर्ण केली, हे वाचून सांगा. मोदी सरकार हे गजनी सरकार आहे, २०१४ आणि २०१९ चे ह्यांना काहीच लक्षात राहत नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. हिंदू-मुस्लीम ही नौटंकी बस करा, कोण मटन खातोय, कुणाला किती मुले आहेत, हे पंतप्रधानांचे काम आहे का, असा सवालही त्यांनी केला.

भाजपला मुले होत नाहीत, त्यात आमचा काय दोष. आमची लेकरे खेळवायला नेत आहात. मला नकली संतान म्हणता. मग उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मला २०१४ मध्ये वाराणसीला का बोलावले होते? त्यावेळी मी कोणाचा मुलगा आहे, हे तुम्हाला माहिती नव्हते का?

-उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT