Sunil Tatkare sakal
लोकसभा २०२४

Sunil Tatkare : विरोधी गटाच्या मंडळींनीच बारामतीमध्ये महादेव जानकर लढणार यांच्या बातम्या पेरल्या ; सुनील तटकरे

"आमच्यावर प्रेम करणारी विरोधी गटाच्या मंडळीना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची भीती वाटत आहे. त्यामुळे या गटानेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महादेव जानकर यांच्या बातम्या पेरल्या आहेत"

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "आमच्यावर प्रेम करणारी विरोधी गटाच्या मंडळीना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची भीती वाटत आहे. त्यामुळे या गटानेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महादेव जानकर यांच्या बातम्या पेरल्या आहेत" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुण्यात बोट क्लब येथे आमदार खासदार यांची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

"जानकर महायुती सहभागी झाले आहेत, त्यांच्या जागेबाबत अजून निर्णय अजून झाला नाही. जानकर यांना कुठला लोकसभा मतदारसंघ द्यायचा, याची घोषणा दोन दिवसात होईल." असे तटकरे यांनी सांगितले. तटकरे म्हणाले, "निवडणुकीसाठी पक्षाचे निरीक्षक त्या त्या ठिकाणी नेमले जाणार आहेत. ही बैठक निवडणूक तयारी बाबत चर्चा करण्यासाठी होत आहे."

राजकारणात सर्व शक्यता असू शकतात. शिरूर, सातारा, नाशिक बाबत तटकरे यांनी टाकली गुगली

आढळराव पाटील यांचा आज पक्ष प्रवेश होईल, त्यांना उमेदवारी पण लवकरच जाहीर होईल,आढळराव पाटील सक्षम उमेदवार आहेत. छगन भुजबळ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक निवडणुका लढल्या आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अशावेळी सहकाऱ्यांशी ते चर्चा करीत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. साताऱ्याच्या जागेबाबत चर्चा सुरू आहे. जागा वाटप अदलाबदली बाबत चर्चा सुरू आहे. राजकाणात सर्व शक्यता असू शकतात, असे ही तटकरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गाला कवच; १३ ठिकाणी स्मार्ट कॅमेरे बसवणार, प्रत्येक वाहनावर करडी नजर राहणार

India squad for World Cup 2027: शुभमन गिल-रोहित शर्मा ओपनर; शमी, भुवीचे पुनरागमन! वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी रवी शास्त्रींनी निवडला भारतीय संघ

Live Updates Marathi : पुण्यात कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात

Rautwadi Waterfall Parking Facility : राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी अन् तासनतास वाहतूक कोंडी! 300-400 वाहनांच्या पार्किंगसाठी 'हा' पर्याय उपलब्ध?

Delhi Protest ला Manoj Jarange Patil यांचा पाठिंबा, काय म्हणाले? | Abhijeet Dipke | CJP

SCROLL FOR NEXT