Kolhapur Loksabha Elections esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Loksabha : धैर्यशील माने, मंडलिक अजूनही गॅसवरच; निर्णय लांबल्याने उमदेवारीचा तिढा कायम, कार्यकर्ते अस्वस्थ

हातकणंगलेत महाविकास आघाडी ‘स्वाभिमानी’ला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. पण, त्याचाही निर्णय झालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

आज (ता. २२) भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक होणार आहे. भाजपने यापूर्वीच त्यांच्या वाट्याच्या २० जागांवरील उमेदवारही जाहीर केले आहेत.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Kolhapur Loksabha Elections) महायुतीच्या जागा वाटप व उमदेवारीचा तिढा अजून कायम राहिल्याने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांचे प्रमुख दावेदार असलेले खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व धैर्यशील माने अजून गॅसवरच आहेत. या दोघांचीही उमेदवारी निश्‍चित समजली जात असली तरी घोषणा लांबत असल्याने दोघांसह त्यांच्या कार्यकर्त्यांतील अस्वस्थता कायम आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदार, आमदारांची बैठक मुंबईत घेतली. शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार शिंदे यांना देण्याचे या बैठकीत ठरले. कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय यापूर्वीच झाला असून, आघाडीतून काँग्रेसच्या चिन्हावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज लढणार आहेत.

हातकणंगलेत महाविकास आघाडी ‘स्वाभिमानी’ला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. पण, त्याचाही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे महायुतीत मात्र दोन्ही जागा कोणाला इथंपासून ते उमेदवार कोण, याविषयीची संभ्रमावस्था कायम आहे. महायुतीकडून हातकणंलेतून खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane), तर कोल्हापुरातून खासदार प्रा. संजय मंडलिक हे इच्छुक आहेत. पण, भाजपच्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही जागा धोक्यात असल्याने या जागेवरील उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू होती.

पण, उमेदवार बदलायचा तर दोन्ही मतदारसंघात महायुतीतील सर्वच पक्षांकडे प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे माने व मंडलिक यांची उमेदवारीच निश्‍चित समजली जाते. त्याची घोषणा आज होईल असे वाटत असतानाच पुन्हा हा निर्णय लांबला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे दोन्ही खासदार मुंबईत तळ ठोकून आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारीची संभ्रमावस्था संपवण्याची मागणी केली होती.

आता आज (ता. २२) भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बैठक होणार आहे. भाजपने यापूर्वीच त्यांच्या वाट्याच्या २० जागांवरील उमेदवारही जाहीर केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतीही जागा भाजपला जाईल याची शक्यता नाही. परिणामी, शिंदे गटाचाच या दोन्ही मतदारसंघावरील दावा कायम राहणार आहे. अशा स्थितीत उमेदवारांची घोषणा लांबल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्‍ये अस्वस्थता आहे.

माझी उमेदवारी निश्‍चित : मंडलिक

याबाबत खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘गेले दोन दिवस आम्ही मुंबईतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी थांबलो आहोत. आज पक्षाची बैठक झाली. त्यातही शिंदे यांनी शब्द दिला आहे. उद्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT