Hatkanangale Loksabha Former MP Nivedita Mane esakal
लोकसभा २०२४

Hatkanangale Loksabha : 'धैर्यशील मानेंना पुन्हा खासदार करण्यासाठी कामाला लागा'; निवेदिता मानेंचा भाजप नेत्यांना संदेश

महायुतीकडून (Mahayuti) पुन्हा एकदा धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी यंत्रणा गतिमान करा, असे त्यांनी सर्वांना सांगितले.

इचलकरंजी : माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane) यांनी काल (शुक्रवार) इचलकरंजीत भाजपच्या नेतेमंडळींबरोबर संवाद साधला. यातील बहुतांश पूर्वाश्रमीचे माने गटाचे समर्थक आहेत. धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी कामाला लागा, असा संदेश माने यांनी यावेळी दिला.

महायुतीकडून (Mahayuti) पुन्हा एकदा धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर निवेदिता माने यांनी आज माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांच्या निवासस्थानी भेट दिली. घरगुती कार्यक्रमानिमित्त त्यांनी ही भेट दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी भाजपचे प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. त्यांच्याशी माने यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधला.

धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी यंत्रणा गतिमान करा, असे त्यांनी सर्वांना सांगितले. याप्रसंगी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अजितमामा जाधव, सुनील महाजन, दिलीप मुथा, अशोक पाटील, अनिल डाळ्या, जयेश बुगड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

Miraj Railway: मिरज-कोल्हापूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल; पुणे विभागातील मेगा ब्लॉकचा परिणाम; काही गाड्यांचे मार्ग बदलले, काहींचा प्रवास अंशतः कमी

Vastu Tips: घर सुंदर दिसावं म्हणून नकली झाडं लावताय? थांबा! वास्तूनुसार ‘या’ ठिकाणी ठेवलेली आर्टिफिशियल झाडं घरासाठी ठरू शकतात अशुभ

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT