Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Elections esakal
लोकसभा २०२४

नारायण राणे की सामंत आज होणार फैसला; महायुती करणार मुंबईत घोषणा, 'या' जागेसाठी शिंदे गटही आशावादी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Elections) तिढा सुटता सुटेना. गेली महिनाभर यावर दावे-प्रतिदावे सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

'किरण सामंत यांना उमेदवारी देण्यास भाजप तयार आहे; परंतु कमळ चिन्हावर ही जागा लढावी, असा भाजपचा आग्रह आहे.'

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा (Mahayuti) उमेदवार कोण, याचा फैसला आज (ता. २८) मुंबईत होणार आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) महायुतीचे उमेदवार की, शिवसेनेचे (शिंदे गट) किरण ऊर्फ भय्या सामंत (Kiran Samant) या घोषणेकडे सर्वांचे लक्ष आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना ठाकरे शिवसेनेने पुन्हा संधी दिली आहे. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली.

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन इच्छुकांनी कामाला सुरुवातही केली आहे. महायुतीच्या उमेदवारांची राज्यातील यादी जाहीर झाली; परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Elections) तिढा सुटता सुटेना. गेली महिनाभर यावर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, असा दावा शिवसेना वारंवार करत आहे तर कोकणपट्ट्यात एकही जागा भाजपला नाही.

ठाणे, कल्याण, रायगडसह सर्व जागा महायुतीला गेल्या आहेत. त्यामुळे ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी भाजप दबाव टाकून आहे. त्यासाठी काही पदाधिकारी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले. ते देखील त्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा मिळावी यासाठी आग्रही आहेत.

वरिष्ठ पातळीवर अजूनही कोणत्याच नावाची घोषणा झालेली नाही. या जागेसाठी भाजपचे पारडे जड असले तरी शिवसेनेने आशा सोडलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास असल्याने ही जागा आपल्याला मिळणार, अशी अजूनही शिवसेना पदाधिकाऱ्यांना खात्री आहे. गुरुवारी (ता. २८) महायुतीच्या उर्वरित जागेवरील उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.

महायुतीचे काम करणार

किरण सामंत यांना उमेदवारी देण्यास भाजप तयार आहे; परंतु कमळ चिन्हावर ही जागा लढावी, असा भाजपचा आग्रह आहे; मात्र याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह किरण सामंत यांचाही विरोध आहे. उमेदवारी मिळो न मिळो; पण आपण महायुतीचे काम करणार, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT