Sharad Pawar sakal
Loksabha 2019

Sharad Pawar : ‘सहभागी होणे अशक्य’; पवारांनी आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याची ऑफर लावली धुडकावून

‘नरेंद्र मोदी एखाद्या समाजाचे नाहीत; तर देशाचे पंतप्रधान आहेत. विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्ये करून ते गैरसमज पसरवीत आहेत. देशाच्या ऐक्याला ते घातक आहे. जे देशाच्या हिताचे नाही, अशा विचारसरणीबरोबर मी कदापि जाणार नाही,’’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘नरेंद्र मोदी एखाद्या समाजाचे नाहीत; तर देशाचे पंतप्रधान आहेत. विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्ये करून ते गैरसमज पसरवीत आहेत. देशाच्या ऐक्याला ते घातक आहे. जे देशाच्या हिताचे नाही, अशा विचारसरणीबरोबर मी कदापि जाणार नाही,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याची ऑफर शुक्रवारी धुडकावून लावली.

नंदुरबारमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्यास सुचविले. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘‘मोदी यांचा संसदीय लोकशाहीवर विश्‍वास नाही.

महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची विचारधारा देशाला एकत्र ठेवणारी, ऐक्याची आहे. त्या विचारांनीच आपल्याला पुढे जावे लागेल. मोदी यांची नुकत्याच झालेल्या काही जाहीर सभांमधील भाषणे पाहता, ते एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्ये निर्माण करत आहेत. त्यातून समाजात गैरसमज पसरत आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत जाण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. लोकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे झाले आहेत. त्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे मोदी अस्वस्थ झाले असावेत. त्यातूनच ते अशी वक्तव्ये करत आहेत.’’

अमित शहा यांनी कर्नाटकमधील जाहीर सभेत मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द करून अनुसूचित जाती (एस्सी), अनुसूचित जमाती (एसटी) समाजाचे आरक्षण वाढवू, अशी घोषणा केली. त्यावर पवार यांनी एस्सी, एसटी समाजाचे आरक्षण वाढविण्यास आमची हरकत नाही. परंतु एखाद्या समाजाचे अधिकार काढून घ्यायला नको, असे नमूद केले. अजित पवार यांनी एका सभेत ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना पुन्हा कसा आमदार होतो हे बघतोच’, असे म्हटल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यावर अजित पवार बालबुद्धीने बोलतात, असे म्हणत त्यांनी फटकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर काँग्रेसचं आंदोलन

Manchar Power Cuts: मंचर शहरात दररोज पाच-सहा वेळा वीज खंडित; २० हजार ग्राहक हैराण, रुग्णालये व व्यवसायांवर मोठा परिणाम

Cyber Crime : सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देऊन एक कोटी ३२ लाखांची फसवणूक

Kanersar Health Camp: कनेरसरमध्ये मोफत आरोग्य शिबिर, वह्या वाटप व गुणवंतांचा सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम

Cooperative Reforms: बदलत्या आर्थिक काळात पतसंस्था व बँकांनी सक्षम, पारदर्शक व व्यावसायिक होण्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT