Gopichand Padalkar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांवर झालेल्या चप्पलफेक प्रकरणात अखेर १० ते १५ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

इंदापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक करण्यात आली होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

इंदापुरात (Indapur) गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) यांच्यावर करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापुर(Indapur) येथील ओबीसी (OBC) एल्गार मेळावा संपल्यानंतर दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेटण्यासाठी गोपीचंद पडळकर निघाले असतांना त्यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली होती. या प्रकरणात आता 10 ते 15 मराठा आंदोलकांवर (Maratha Protesters) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या अज्ञात 10 ते 15 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक झाला होता. या चप्पलफेक प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती. चप्पलफेक करणं म्हणजे वादाचा प्रकार आहे. दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाचे नेते शशिकांत तरंगे यांनी दिला होता. याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेनंतर सकल ओबीसी समाजाकडून संविधान चौक इंदापूर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सदरील घटना निंदणीय असून, या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरू, असा इशारा या वेळी ओबीसी बांधवांकडून देण्यात आला होता.

पुणे जिह्यातील इंदापूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर याच्यासह अनेक ओबीसी नेते हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT