Aeroplane 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : देशांतर्गत जानेवारी ते ऑगस्टमध्ये विमानाने 12 कोटी जणांचा प्रवास; प्रवासी संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News : देशांतर्गत जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या आठ महिन्यांमध्ये विमानाने ११ कोटी ९० लाख ६० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ३८.२८, तर मासिक २३.१३ टक्के वाढ झाली आहे. विमान वाहतूक उद्योगाने प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ अनुभवली आहे. (12 crore people travel by air from January to August within country maharashtra news)

गेल्या देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या एक कोटी ४८ लाख २७ हजार इतकी राहिली. विमान प्रवास वाढीतील हा वरचा कल उद्योगाची लवचिकता आणि कोरोनाच्या संकटातून सावरल्याचे द्योतक आहे.

विशेष म्हणजे, वेळापत्रकानुसार कार्यरत देशांतर्गत विमानसेवा रद्द होण्याचे प्रमाण ०.६५ टक्के इतके कमी आहे. ऑगस्ट दरम्यान, देशांतर्गत विमान कंपन्यांकडून एकूण २८८ प्रवास संबंधित तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

तक्रारींचे हे प्रमाण १० हजार प्रवाशांच्या तुलनेत ०.२३ इतके राहिले. कमी तक्रार आणि विमाने रद्द होण्याचा दर हा ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देण्याच्या आणि प्रवाशांना विश्वासार्ह आणि कार्यक्षम सेवा प्रदान करण्याच्या उद्योगाच्या प्रयत्नांना मिळालेला दाखला आहे, असे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया म्हणाले की, देशांतर्गत विमानसेवा क्षेत्रात होणारी ही सातत्यपूर्ण वाढ म्हणजे सुरक्षित, कार्यक्षम आणि ग्राहक-केंद्रित विमानचालन सेवेला चालना देण्यासाठी विमान कंपन्या, विमानतळ आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नांना मिळालेला दाखला आहे.

विमान सेवा उद्योग प्रवासाच्या वाढत्या मागण्या आणि नियमांशी जुळवून घेत प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. जसा हवाई प्रवास वाढत जाईल तशा देशांतर्गत विमान कंपन्या संपूर्ण देशातील आर्थिक वाढ आणि ‘कनेक्टिव्हिटी' सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT