36 tehsildars Transfers in maharashtra  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच ३६ तहसिलदारांच्या बदल्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पण...

सकाळ डिजिटल टीम

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच ३६ तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.(36 tehsildars Transfers in maharashtra )

राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान अवकाळी पावसामुळं झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात दिली होती.

Maharashtra Budget 2023 : सर्वसामान्यांच्या हातात काय पडले?

तसेच अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं.

याचदरम्यान राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक होत शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

बदली करण्यात आलेले तहसीलदार

कविता जाधव (तहसिलदार,रोहा), श्वेता पवार(अपर तहसिलदार,कल्याण),भाऊसाहेब अंधारे( तहसिलदार,उरण), प्रवीण लोकरे(तहसिलदार, वेंगुर्ला), विकास गारुडकर(अपर तहसिलदार ,माणगाव), प्रियंका कांबळे- अहिरे(तहसिलदार, माणगाव).

माधवराव बोथीकर (तहसिलदार, उमरी,नांदेड), पल्लवी टेमकर(तहसिलदार,पूर्णा,परभणी), गोविंद येरमे(तहसिलदार, गंगाखेड), रमेश कुंभरे,(तहसिलदार साकोली, भंडारा), संतोष महाले (तहसिलदार, देसाईंगंज), उमेश पाटील (तहसिलदार, अहमदनगर) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT